आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Congress MLA Sanjay Datt Will Com In Jalgaon

अपयशाचा शोध घेण्यास जळगावला येणार काँग्रेसचे संजय दत्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिका निवडणुकीत एकही नगरसेवक निवडून न आलेल्या काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकर्‍यांचा पोकळ आत्मविश्वास त्यांच्या अंगलट आला आहे. पक्षाने आगामी निवडणुकांच्या दृष्टीने जळगावचा पराभव गांभीर्याने घेतला आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत देखील स्थानिक पदाधिकार्‍यांनी पक्षाला अंधारात ठेवले होते. त्यामुळे चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले आमदार संजय दत्त हे रविवारी जळगावात येणार आहेत.

जिल्ह्यात पक्षाची स्थिती सुधारण्यासाठी चालून आलेल्या संधीचे सोने करण्यासाठी पक्षाने महापालिका निवडणुकीत स्थानिक पदाधिकार्‍यांना ताकद देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार खुद्द मुख्यमंत्री निवडणुकीत लक्ष घालणार होते. त्यासाठी राज्यमंत्री राजेंद्र मुळक आणि आमदार शरद रणपिसे यांची नियुक्ती करण्यात आली होती. निरीक्षक रामहरी रुपनवार यांनी काँग्रेसचीच सत्ता येणार असल्याचा दावा केला होता. दरम्यान, पक्षाची स्थानिक स्थिती लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जळगावला येण्याचे टाळले होते. पक्षाने गेल्या निवडणुकीचाच पराभवाचा कित्ता गिरवला. एकही जागा मिळवू न शकल्याने प्रदेशवरून नाराजी व्यक्त करण्यात आली. पक्षाच्या पदाधिकार्‍यांमुळेच निवडणुकीत पराभव झाल्याबाबत प्रदेशकडे तक्रारी केल्यानंतर पराभवाची चौकशी करण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्षांनी घेतला आहे. आमदार संजय दत्त हे या पराभवाच्या कारणांची चौकशी करणार असून तसा अहवाल प्रदेशला देणार आहेत. रविवारी मुख्यमंत्र्यांसोबत ते जळगावात येणार आहेत.