आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाेन काेटी दिले तरीही वाहने मिळेना; भीतीपाेटी मनपाने पुन्हा भरले एक कोटी 39 लाख रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- गेल्या महिन्यात थकबाकीपाेटी अधिकारी, पदाधिकाऱ्यांची वाहने जप्त करून पालिकेची अब्रू वेशीवर टांगण्याचा प्रकार महसूल विभागाने केला हाेता. १२ काेटींची मागणी असून पालिकेने तातडीने दाेन काेटी भरले. मात्र, अजूनही पालिकेची वाहने साेडण्यास महसूल िवभाग तयार नाही. त्यामुळे महापािलकेची माेठी पंचाईत झाली अाहे.

महसूल विभागाचे महापालिकेकडे जमिनीच्या अकृषक साऱ्याबाबतचे सुमारे १२ काेटी ३९ लाख रुपये घेणे अाहेत. पालिकेने थकबाकी वाढवल्याने महसूल विभागाने २५ फेब्रुवारी राेजी तहसीलदारांमार्फत अायुक्त, महापाैरांसह सहा अधिकारी पदाधिकाऱ्यांची वाहने जप्त केली हाेती. दाेन िदवसांनी महापालिकेने ५५ लाख रुपये भरून अायुक्त महापाैर या महत्त्वाच्या लाेकांची वाहने साेडवून घेतली. अाता या कारवाईला तब्बल २६ दिवस उलटले अाहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी थकबाकीपाेटी पालिकेच्या इमारतीला कुलूप लावण्याचा इशारा दिला हाेता. त्यामुळे पालिकेने महसूल विभागाला मुद्रांक शुल्काचे एक काेटी ३९ लाख रुपये शुक्रवारी वर्ग केले अाहेत. त्यानंतर चार वाहने मिळतील, अशी अपेक्षा हाेती. परंतु, दाेन दिवस उलटूनही वाहने मिळाल्याने महसूल विभाग पालिकेकडून अाणखी काही रक्कम वसूल करण्याच्या तयारीत दिसत अाहे. त्यामुळे वाहनांपेक्षा पालिकेला कुलूप कसे टाळता येईल? यासाठीच अधिकारी प्रयत्न करीत अाहेत. महत्त्वाच्या दाेन व्यक्तींची वाहने साेडवल्याने अधिकारी पदाधिकाऱ्यांमध्येही वेगवेगळ्या चर्चा सुरू अाहेत.