आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेतर्फे अंत्यविधीसाठी मोफत लाकूड, रॉकेल मिळण्याची प्रतीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- लेखापरीक्षणात ताशेरे ओढण्यात आल्याचे कारण पुढे करत प्रशासनातर्फे अंत्यविधीसाठी मोफत साहित्य देण्याचे डिसेंबर २०१३पासून बंद झाले होते. कायदेशीर त्रुटी दूर करत प्रशासनातर्फे महापालिका स्थापनेनंतर पहिलीच उपविधी तयार करून महासभेत तिला मंजूर करण्यात आले होते. महासभेने मान्यता दिली असली तरी राज्य शासनाकडून या ठरावाला मंजुरी देण्यात आली नसल्याने जळगावकरांना अजूनही अंत्यविधीसाठी विकत लाकडे घ्यावी लागत आहेत.
नगरपालिका असताना पासून हिंदू धर्मीयांच्या अंत्यविधीसाठी विनामूल्य लाकडे, मुस्लिम धर्मीयांच्या अंत्यविधीसाठी बरगे तर नाथजोगी समाजाच्या दफनविधीसाठी मिठाचा विनामूल्य पुरवठा करण्यात येत होता. महापालिका स्थापनेनंतरही हीच पद्धती सुरू होती. मात्र, महाराष्ट्र महापालिका अधिनियमात यासंदर्भातील तरतूद नसल्याने लेखा परीक्षण अहवालात यासाठी झालेल्या खर्चावर ताशेरे ओढण्यात आले होते. अंत्यविधीसाठी साहित्य पुरवण्याचा विषय सभागृहात चर्चेला आल्यावर कायदेशीर अडचणी असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात येत होते. नाशिक, नगर, धुळ्यासह राज्यातील इतर महापालिकांमध्येही अंत्यविधीचे मोफत साहित्य पुरवले जात असल्याकडे ‘दिव्य मराठी’ ने लक्ष वेधले होते. जळगाव महापालिकेलाही यासाठी उपविधी तयार करून माेफत लाकडे पुरवठा करता येणे शक्य नसल्याकडे लक्ष वेधल्यावर पालिका प्रशासनातर्फे राज्यातील इतर महापालिकांनी केलेल्या उपविधींची माहिती मागवली होती.

पालिका स्थापनेनंतर महासभेत पहिलीच उपविधी मंजूर केली हाेती. महासभेच्या मंजुरीनंतर राज्य शासनाच्या मंजुरीसाठी ही उपविधी पाठवण्याचे ठरले हाेते. शासनाने मंजुरी दिल्यावर राजपत्रात प्रसिद्ध झाल्यावरच अंत्यविधीसाठी मोफत साहित्य पुरवण्यात येईल.