आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर असोदा रस्त्याच्या कामाचा श्रीगणेशा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मोहन टॉकीज ते असोदा रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एका वाहनधारकाचा बळी गेला होता. त्या वेळी संतप्त ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. त्यावेळी महापालिका प्रशासनाने आश्वासन दिल्यानुसार बुधवारी रस्त्याच्या कामाचा श्रीगणेशा झाला.
मोहन टॉकीज ते आसोदा रेल्वे गेटदरम्यानच्या रस्त्याच्या दुर्दशेचा विषय ‘दिव्य मराठी’ने लावून धरला होता. १२ मीटर रुंदी असलेल्या रस्त्याच्या काम दोन महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. मोहन टॉकीज ते रेल्वे गेटपर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाल्यामुळे डांबरीकरण करण्याच्या कामाला मंजुरी दिली हाेती. दरम्यान, पालिका फंडातून ५० लाख ७९ हजार ८२९ रुपये या कामासाठी मंजूर केले तरी पैसे मिळण्याची खात्री नसल्याने आतापर्यंत मक्तेदार पुढे येत नव्हता. या ठिकाणी २६ डिसेंबरला झालेल्या दुर्घटनेत वृद्धाचा मृत्यू झाल्यावर पालिकेने मक्तेदारामार्फत हे काम सुरू केले आहे. बुधवारी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले मातीचे भराव जेसीबीच्या साहाय्याने काढले आहेत. रस्त्याच्या हद्दीत असलेल्या कच्च्या गटारी बुजून खडीकरणाचे काम सुरू होईल. या रस्त्यावर पाणी साचत असल्याने तसेच खाली काळीमाती असल्याने एक ते दीड फुटापर्यंत उंची वाढवण्यात येणार आहे.