आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या राजकारणात ललित कोल्हेंची ‘आघाडी', किंगमेकर होण्यासाठी हालचाली सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- विधानसभा निवडणुकीत अपेक्षित मताधिक्य मिळाल्याने व्यथित झालेल्या ललित कोल्हे यांनी मनसेच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, महापालिकेच्या राजकारणात किंगमेकर होण्यासाठी कोणत्याही पक्षात जाता ‘आघाडी' करून स्वत:चे अस्तित्व कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न राहू शकतो. त्यामुळेच ते पक्षही सोडण्याची शक्यता वाढली आहे. आमदारकी हातातून निसटल्यानंतर आता किमान महापालिकेच्या तिजोरीची किल्ली हाती राखण्याच्या हेतूने कोल्हेंनी हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.
राज्यात 13पैकी फक्त एकाच जागेवर वि‍जिय मिळालेल्या सपाटून मार खाल्लेल्या मनसेत पाच वर्षे थांबून राजकीय भवितव्य नसल्याचा अंदाज घेतलेल्या ललित कोल्हे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे मानले जात आहे. तसेच कोल्हेंपाठाेपाठ महानगर संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले आहेत. मात्र, सध्या कार्यकर्ता म्हणून राहण्याचे वक्तव्य करणारे कोल्हे येत्या अाठवडाभरात नवीन अाघाडी स्थापण्याची घाेषणा करू शकतात. त्यादृष्टीने त्यांच्याकडून हाेणाऱ्या हालचालींना गतीदेखील अाली अाहे. अशा परिस्थितीत काेल्हंेनी निर्माण केलेली मनसेची ताकद त्यांच्या राजीनाम्यामुळे कमी हाेणार अाहे. त्यामुळे मनसेचे शहरातील भवितव्य डळमळीत हाेणार, हे निश्चित झाले अाहे.

चार वर्षे सत्तेत राहण्याचा प्रयत्न
विधानसभेतपराभव झाल्यानंतर पुन्हा पक्षासाठी पाच वर्षे काम करण्यापेक्षा मनपात सत्तेत सहभागी होऊन ताकद वाढवण्याचा कोल्हेंचा प्रयत्न असू शकतो. अापल्याच 12 सेवकांच्या पाठीशी उभे राहून आगामी चार वर्षांत चांगली विकासकामे करून ताकद वाढवता येऊ शकते. प्रभागांमध्ये विकासकामे करण्यासाठी सत्तेची गरज आहे. सध्या शहराचे आमदारपद भाजपकडे असून, राज्यातही भाजपचीच सत्ता आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसाेबत राहून फायदा करवून घेण्याची खेळी कोल्हेकडून होऊ शकते.
जनक्रांती कोणासोबत? महापालिका निडणुकीनंतर खाविआ सत्तेत येण्यासाठी जनक्रांतीचा पाठींबा ि‍मळाला हाेता. परंतु िवधानसभा निवडणुकीत घडलेल्या घटनांमुळे पुलाखालून बरेच पाणी वाहुन गेले अाहे. त्यामुळे जनक्रांतीचे दाेन नगरसेवक काेणासाेबत जातात यावर स्थायी समितीतील सदस्य वाढ अवलंबुन राहणार आहे. िवधानसभेसाठी काेल्हेंना मदत करणारे जनक्रांतीचे गटनेते सुनील पाटील हे ललित काेल्हेंसाेबत राहण्याची शक्यता वाढली अाहे. त्यामुळे काेल्हेंची सभागृहातील ताकद नक्कीच वाढणार अाहे. यामागे जनक्रांतीच्या नगरसेवकांच्या प्रभात काेणतीच िवकास कामे झाली नसल्याचे कारण मानले जात अाहे.
महसूलमंत्री खडसेंची भेट घेणार
महसूलमंत्रीएकनाथ खडसेंच्या सत्कारप्रसंगी भेटायला येण्याचे अामंत्रण काेल्हेंना िमळाले अाहे. तसेच अाठवडाभरात स्थायी समिती सदस्य सभापती निवडीच्या हालचालींना वेग येणार अाहे. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादी काेल्हेंची अाघाडी एकत्र येऊन खान्देश िवकास अाघाडीला ‘दे धक्का’ देण्याची रणनीती खडसेही अाखत अाहेत. त्यासाठी भाजपला काेल्हेंची गरज पडणार अाहे. या सर्व शक्यता लक्षात घेऊन दाेन िदवसांत काेल्हे हे खडसेंच्या भेटीसाठी मुंबईला जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त अाहे. तसेच अागामी घडामाेडींबाबत अामदार गुरुमुख जगवाणी काेल्हे यांच्यात गुफ्तगू झाल्याचेही सांगितले जातेय.