आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थकबाकीदार मंगल कार्यालये सील, पालिका प्रशासनाची धडक कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - एकीकडे विकास कामांना पैसा नसताना दुसरीकडे पगारासाठीही व्यवस्था हाेत नसल्याने पालिका प्रशासनाने अाता थकबाकीदारांच्या मुळावर घाव घालण्याचे काम सुरू केले अाहे. वर्षानुवर्षे व्यावसायिक वापर करूनही पालिकेच्या कराचा भरणा करणाऱ्या तीन मंगल कार्यालयांना थेट सील ठाेकण्याची कारवाई पालिकेने केली अाहे. यामुळे बड्या थकबाकीदारांना माेठा दणका बसला असून, ही धडक माेहीम सुरूच ठेवली जाणार अाहे. 
 
शासनाच्या अनुदानावर अवलंबून राहाव्या लागणाऱ्या महापालिकेने स्वत:च्या उत्पन्नाकडे लक्ष दिल्यास काेणाच्या मदतीची गरज भासणार नाही, असे वारंवार सांगितले जाते; परंतु गेली अनेक वर्षे त्याकडे साेईस्कररीत्या दुर्लक्ष केले गेले. यंदा बऱ्याच वर्षांनी मार्च महिन्यापूर्वीच वसुलीचा अाकडा ५० टक्क्यांपर्यंत पाेहोचला अाहे. मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दिष्ट ७५ टक्के निश्चित केलेल्या पालिका प्रशासनाने मार्चअखेर डाेळ्यासमाेर ठेवत थकबाकीदारांना जाेरदार धक्का देण्याचा निर्णय घेतला अाहे. अायुक्त जीवन साेनवणे यांनी यापूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे मार्चनंतर बड्या थकबाकीदारांची यादीच प्रसिद्ध केली जाणार अाहे. लाखाे रुपयांची थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांना जप्तीपूर्वीच्या नाेटिसा यापूर्वीच बजावण्यात अाल्या अाहेत.

त्यानुसार अाता प्रभाग अधिकाऱ्यांनी थेट कारवाई सुरू केली अाहे. शनिवारी साेमवारी शहरातील तीन मंगल कार्यालयांना सील ठाेकून राजकीय पदाधिकाऱ्यांनाच टार्गेट करत पालिकेने ‘जाेर का झटका’ दिला अाहे. शिवाजीनगरातील नाभिक समाज मंगल कार्यालय क्षत्रिय मराठा समाज मंगल कार्यालय तसेच कांचननगरातील वाणी समाज मंगल कार्यालयाला सील ठाेकण्याची कारवाई करण्यात अाली. विशेष म्हणजे, या तिन्ही मंगल कार्यालयांचा कारभार अाजी-माजी नगरसेवकांकडे अाहे. पालिका प्रशासनाने थेट राजकीय पदाधिकाऱ्यांशी संबंधित मालमत्तांवर कारवाई सुरू केल्याने बड्या थकबाकीदारांचे धाबे दणाणले अाहे. 
 
कारवाई सुरूच राहणार 
पालिकाप्रशासनानेथकबाकीदारांवर कारवाई सुरू केली अाहे. मंगल कार्यालयांकडेही माेठ्या प्रमाणात थकबाकी अाहे. कारवाईपूर्वी प्रशासनाने जप्तीपूर्वीच्या नाेटिस बजावल्या हाेत्या; परंतु त्यानंतरही थकबाकी भरल्याने तीन मंगल कार्यालयांना सील केले अाहे. ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार अाहे -  विलास
साेनवणी, प्रभाग अधिकारी 
 
बातम्या आणखी आहेत...