आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Municipal Administration,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यायालयाने पोलिसांना फटकारल्यानंतर हंजीरवर दाखल झाला गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- हंजीरप्रकरणीगुन्हा दाखल करण्यासाठी लेखी तक्रार देऊनही कारवाई करणा-या तालुका पोलिसांनी न्यायालयाने आदेश देताच गुन्हा दाखल केला आहे. मात्र, गुन्हा दाखल करण्याची मानसिकता नसलेली पोलिस यंत्रणा या गुन्ह्याचा तपास किती दिवसांत पूर्ण करेल, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

पालिका प्रशासनाला पूर्वकल्पना देता परस्पर प्रक्रिया बंद केल्याप्रकरणी हंजीर बायोटेकवर गुन्हा दाखलसाठी तालुका पोलिसात अर्ज देण्यात आला होता. कराराचा भंग करणे फौजदारी स्वरुपाचा गुन्हा होऊ शकत नसल्याचे सांगत पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे पालिकेने न्यायालयात धाव घेतली होती. न्या.व्ही. एस. पाटील यांनी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास केल्यावर अहवाल सादर करण्याचे आदेश सोमवारी दिला होता. या आदेशाची प्रत प्राप्त झाल्यावर बुधवारी तालुका पोलिसांकडे देण्यात आली आहे. त्यानुसार कलम १५६ (३) अन्वये गुन्हा दाखल करून चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्‍यात आले आहेत.