आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या जलशुद्धीकरणाची भिंत कोसळली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- उमाळायेथील महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राची फूट उंचीची सुमारे १०० ते १२५ फूट लांबीची भिंत शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास कोसळली. ईश्वर पेपर मिलच्या मागील बाजूस असलेल्या भिंतीचे बांधकाम निकृष्टपणे झाल्याने पायासह भिंत कोसळली आहे. या घटनेविषयी मात्र महापालिकेतील बांधकाम पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, अभियंता सायंकाळपर्यंत अनभिज्ञच होते. रात्री उशिरापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी केली नव्हती.

बोअरवेलचेनुकसान : संरक्षकभिंतीच्या आवारात पाणी वाहून जाण्यास कुठेही मार्ग नव्हता. यातच भिंतीस अनेक तडेही पडले होते. त्यामुळे सतत पाणी साचल्याने भिंत कोसळली असावी, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. मात्र १०० ते १२५ फुटापर्यंतची भिंत एकाचवेळेस कोसळल्याने विविध तर्कवितर्कही लावले जात आहेत. वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून ही भिंत उभारली होती. संरक्षक भिंतीचे बांधकाम हे अतिशय निकृष्टपणे झाले होते. संरक्षक भिंतीला अाधारासाठी कुठेही सिमेंटचे कॉलम उभारलेले नव्हते.