आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Commissioner Appointed To Round The City

शहराचे वाटोळे करण्यासाठी मनपा आयुक्तांची नियुक्ती, स्थायी सभेत गाैप्यस्फाेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहराचे वाटोळे करण्यासाठीच आयुक्त संजय कापडणीस यांची नियुक्ती केल्याचे भाजप आमदार डॉ. गुरुमुख जगवानी हे सांगत असल्याचा गौप्यस्फोट खाविआचे नेते नितीन लढ्ढा यांनी केला. जळगाव शहराबद्दल असे वक्तव्य करणाऱ्या मानसिकतेचा निषेध करताच भाजप नगरसेवकांनी गदारोळ केला. दोन्ही पक्षांमध्ये जोरदार शाब्दिक फैरी झडल्याने वातावरण प्रचंड तापले होते. आमदारांचा उल्लेख केल्याचा निषेध करत भाजपनेही सभात्याग केला. यामुळे भाजप खाविआ यांच्यातील संबंध प्रचंड ताणले गेले आहेत.

महापालिकेची स्थायी समितीची सभा शुक्रवारी सकाळी ११ वाजता सभापती नितीन बरडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नावर सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. नितीन लढ्ढा यांनी आयुक्त हे मोजक्या लोकांच्या हातचे बाहुले झाले असून त्यांना कठपुतली बनवून शहर उद्ध्वस्त करण्याचे षड््यंत्र रचले जात असल्याचा गंभीर आरोप केला. कामे झाली नाहीत म्हणजे खाविआवर खापर फोडायला मोकळे. आम्हाला शिक्षा द्या पण जळगावच्या लाख जनतेला कशाला वेठीस धरतात? असा सवाल केला. मनसेचे अनंत जोशी यांनी सध्या सुडाचे राजकारण सुरू असल्याचे म्हटले, तर शहराचे वाटाेळे करण्याची भाषा करणाऱ्या विकृत बुद्धीचा निषेध केला आयुक्तांनी खरच सुपारी घेतली का? असा सवालही केला.

भाजपचा सभात्याग अन् खाविआचा निषेध
सभागृहातभाजप आमदार जगवानींचे जाहीर नाव घेतल्यानंतर भाजप नगरसेवक ज्योती चव्हाण, पृथ्वीराज सोनवणे, अनिल देशमुख विजय गेही यांनी खाविआ मनसेवर शाब्दिक हल्ला चढवला. स्थायी समितीत खासदार-आमदारांचा उल्लेख करण्याची गरज नसल्याचा मुद्दा मांडला. अनिल देशमुख यांनी आयुक्त बोगस असतील तर त्यांच्याविरुद्ध अविश्वास आणा, असे आव्हान दिले. आमदार जगवानींचे नाव घेतल्याचा निषेध करत चार भाजप नगरसेवकांनी सभात्याग केला.

भाजपच्या मागणीनंतर घेतले नाव
भाजपनेत्यांकडून मिळणाऱ्या वागणुकीवर बोलताना लढ्ढा म्हणाले की, ‘शहराचे एक आमदार सांगतात की, आयुक्तांची नियुक्ती ही शहराचे वाटोळे करण्यासाठी केली आहे; त्यांनी म्हटले तरी त्यांची बदली होऊ देणार नाही’ असा गौप्यस्फोट केला, असे घाणेरडे राजकारण केले जात आहे.
ज्या जळगावकरांनी विश्वास व्यक्त केला ते लोकप्रतिनिधी आपल्याच शहराबद्दल असे बाेलत असतील तर त्यांना जनता जागा दाखवेल, अशी भावना व्यक्त केली. आयुक्तांना डोक्यावर घेऊन फिरा, असा टोलाही लगावला. भाजपच्या नगरसेविका ज्योती चव्हाण यांनी लढ्ढा यांच्या वक्तव्याचा निषेध केला. एक अामदार असे का सांगतात, थेट नाव घ्या असे आव्हान देताच नितीन लढ्ढा यांनी विधान परिषद आमदार डॉ. जगवानी यांनी हे बेताल वक्तव्य केल्याचे जाहीर केले.