आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेवढ्या सुविधा, तेवढाच कर आकारणार! जन्माच्या दाखल्याची पहिली प्रत देणार मोफत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव'- महापालिकेची सध्याची आर्थिक स्थिती आणि सुचवलेल्या तरतुदींचा अभ्यास करून प्रशासनाने काेणताही फुगवटा करता प्रत्यक्ष वस्तुस्थितीचा ताळेबंद मांडणारे अर्थसंकल्प सादर केले आहेत. त्यात कुठलीही करवाढ सुचवण्यात आलेली नाही. तथापि, मालमत्तांवर आकारण्यात येणाऱ्या करात असलेली तफावत दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांनुसारच करांची आकारणी असावी, असा विचारही या वेळी पुढे आला. त्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळणार आहे.
महापालिकेचे २०१४-१५चे सुधारित २०१५-१६चे अंदाजपत्रक पालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी शुक्रवारी स्थायी समिती सभेत सादर केले. अध्यक्षस्थानी सभापती ज्याेती चव्हाण हाेत्या. त्यानंतर सभा तहकूब करून यावर १८ फेब्रुवारीला चर्चा होणार आहे. अायुक्तांनी अंदाजपत्रकातील समाविष्ट बाबींची माहिती सभागृहाला दिला. त्यात अागामी वर्षासाठी मालमत्ता करात वाढ प्रस्तावित नसल्याचे स्पष्ट केले. सध्या शहरात मालमत्ता कराची अाकारणी परिसरानुसार वेगवेगळ्या पद्धतीने केली जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी अाहेत.
एप्रिलमध्ये मालमत्ता कर भरणाऱ्यांना 7 एेवजी टक्के सूट.
कन्याजन्माचा गाैरव करण्यासाठी एक किंवा दाेन मुलींनंतर शस्त्रक्रिया करणाऱ्यांना अागाऊ कर भरणाऱ्यांना अतिरिक्त टक्के सूट.

महिला बचतगट, घरगुती महिला उद्याेग सुशिक्षित बेराेजगारांना प्राेत्साहन देण्यासाठी एप्रिलमध्ये कर भरणाऱ्यांना टक्के अतिरिक्त सूट. रस्त्यावरील किरकाेळ वृत्तपत्र िवक्रेत्यांना डेली बाजार फीमधून सूट देण्याचा प्रस्ताव. एमअायडीसीत नवीन उद्याेग अाल्यास एप्रिलमध्ये कर भरल्यास मालमत्ता करात पहिल्या वर्षी ५०, दुसऱ्या वर्षी २५ पुढील वर्षे १० टक्के सूट दिली जाईल.
एकाच जागी थांबून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांकडून २०, तर न्याय्य फेरीवाल्यांकडून १० रुपये फी अाकारणी. सामूहिक विवाहांना प्राधान्य िमळण्यासाठी खुल्या जागा िवनामूल्य उपलब्ध करून देण्याची पालिकेची तयारी. जन्मलेल्या बालकांची नाेंद करताना जन्म दाखल्याची प्रथम प्रत माेफत मिळणार. महानगरपलिकेचे अंदाजपत्रक आयुक्त संजय कापडणीस यांनी स्थायी समिती सभापती ज्योती चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केले.