आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाव्य हल्ल्याच्या वृत्ताने मनपा प्रशासन हादरले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- माझ्यावर हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती कळली आहे. त्यामुळेच मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. सध्या काळजी घेतोय. परंतु, मी घाबरणार नाही, मी माझे काम सुरूच ठेवणार आहे. तसेच असल्याचे मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना स्पष्ट केले. तसेच पत्रात गंभीर बाबींचा उल्लेख असल्याचे मान्य करत त्यादृष्टीने आता पाेलिस प्रशासन काम करेल, असेही आयुक्त म्हणाले.

आयुक्त संजय कापडणीस यांनी २० जून रोजी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांना बंद पाकिटात एक गोपनीय पत्र दिले होते. त्यात त्यांच्या जीवाला धोका असून त्यांच्यावर कोणत्याही क्षणी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली आहे. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने बुधवारी ‘मनपा आयुक्तांवर हल्ल्याची शक्यता; गोपनीय पत्राने खळबळ’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर राजकीय प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एवढेच नव्हे तर अधिकारी कर्माचारी देखील प्रंचड हादरले आहे. बुधवारी महापालिकेसह शासकीय कार्यालयांमध्येही याच वृत्ताची चर्चा सुरू होती. सकाळपासून कार्यालयात आयुक्तांना भेटण्यासाठी नगरसेवक येत होते. तसेच कोण असे गैरकृत्य करू शकताे, याची विचारणाही करीत होते. आयुक्तदेखील ‘हो हे खरं आहे’ असे म्हणून उत्तर देताना दिसत होते.

कार्यालयात गर्दी
‘दिव्यमराठी’त वृत्त प्रसदि्ध झाल्यानंतर दिवसभर आयुक्तांच्या भेटीसाठी येणाऱ्यांची संख्या वाढली होती. यात उपमहापाैर सुनील महाजन, चेतन शिरसाळे, माजी महापौर किशोर पाटील, कैलास सोनवणे, अतुलसिंह हाडा, मनोज काळे यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचाही समावेश होता. सकाळपासून कार्यालयात आलेले आयुक्त थेट सायंकाळीच कार्यालयातून बाहेर पडले.
दडपण आणण्याचा प्रयत्न
सध्या प्रशासन लोकप्रतिनिधी यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. सभांच्या माध्यमातून प्रशासनाला टीकेचे लक्ष्य केले जात आहे. प्रशासन त्यांच्या पद्धतीने काम करीत असल्याने आयुक्तांवर दबाव आणून त्यांची बदली व्हावी अथवा ते रजेवर निघून जावेत, असाही प्रयत्न अशा घटना घडवून आणण्यामागे असाव्यात, असा अंदाज वर्तवला जाताेय.
हा प्रकार चुकीचा
- लोकशाहीतपद वैयक्तिक संबंध वेगळे असतात. आयुक्तांनी हल्ल्यासंदर्भात शक्यता वर्तवल्याने आम्हीदेखील या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी करणार आहोत. धमकीचा प्रकार चुकीचा आहे.
सुनील महाजन, उपमहापौर
सत्यसमोर यावे
- आयुक्तांवर हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवल्यामुळे आता यामागच्या कारणांचा शोध घेतलाच पाहिजे. याप्रकरणातील सत्य काय आहे ते लवकरच सगळ्यांसमोर आलेच पाहिजे.
डॉ. अश्विन सोनवणे, गटनेते भाजप
धमकीचा निषेध
- विकास होण्यास फक्त आयुक्त जबाबदार असल्याचा अपप्रचार सत्ताधाऱ्यांकडून पसरवला जातोय. कामकाजात अनेकदा प्रशासनाला कटू निर्णय घ्यावे लागतात. धमकी देणाऱ्याचा मी निषेध करतो.
नरेंद्र पाटील, गटनेते मविआ
बातम्या आणखी आहेत...