आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Municipal Corporation Administration,latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करबुडवे निशाण्यावर! मालमत्ताकर थकबाकीदारांकडून कागदपत्रे मागवली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पालिका प्रशासनातर्फे उत्पन्न वाढीसाठी प्रशासनाकडून मालमत्ता सर्वेक्षणाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पालिका अधिकारी-कर्मचा-यांपासून ही मोहीम सुरू करण्याचे सूतोवाच आयुक्तांनी दिले होते; मात्र तसे झाले नाही. चारही प्रभागातील मालमत्ता कराची मोठी थकबाकी असलेल्या 490 जणांची यादी तयार झाली आहे. या थकबाकीदारांना नगररचना विभागाकडून नोटीस देण्यात आल्या आहेत. संबंधितांनी आपल्या मालमत्तेसंदर्भातील सगळी कागदपत्रे सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
हुडकोची एकरकमी कर्ज फेड होईपर्यंत पालिकेला दरमहिन्याला तीन कोटी रुपयांचा भरणा करावा लागणार आहे. पालिकेच्या तिजोरीत असलेली संपूर्ण रक्कम एका दिवसात खर्ची झाल्यानंतर पुढील महिन्याचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाने उत्पन्नवाढीचे प्रयत्न सुरू केले आहेत. पालिकेच्या आकडेवारीनुसार शहरात एकूण ८६ हजार मालमत्ता आहेत. या मालमत्तांमध्ये गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढ झाली असून सध्या सुमारे एक लाख मालमत्ता असण्याचा अंदाज आहे. 2002 नंतर मालमत्तांचे फेर सर्वेक्षण झालेले नाही. मालमत्ता करातून किमान 90 कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे, प्रत्यक्षात मात्र त्याबद्दल 55 ते 60 कोटी रुपयेच जमा होतात. मालमत्तांचे फेर सर्वेक्षण केल्यास वाढीव मालमत्तांसह किमान 200 कोटींपर्यंत उत्पन्न जाईल असा अंदाज आहे. मालमत्तांचे सर्वेक्षण करताना पालिका अधिकारी कर्मचाऱ्यांपासूनच सुरुवात करण्यात येणार असल्याचे संकेत आयुक्तांनी पूर्वी दिले होते. प्रत्यक्षात मात्र चारही प्रभागातील बड्या थकबाकीदारांपासून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. तपासणीसोबत मालमत्ताकराचा भरणाही होईल, असा उद्देश प्रशासनाने ठेवला आहे
नोटीस बजावणे सुरू
चारहीप्रभागातील थकबाकीदारांच्या याद्या प्राप्त झाल्या असून संबंधितांना नोटीस बजावण्याचे काम सुरू झाले आहे. थकबाकीदारांनी मालकी हक्काची कागदपत्रे, बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र नगररचना विभागात सादर करायचे आहे. कागदपत्रे सादर करणाऱ्यांची बांधकामे अनधिकृत असल्याचे गृहित धरून त्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल. चंद्रकांतनिकम, सहायकसंचालक नगररचना