आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Building Poster Issue Jalgaon

जाहिरातींच्या पोस्टरमुळे सतरा मजलीचे विद्रुपीकरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - स्थानिक स्वराज्य संस्थेची आशिया खंडातील प्रशस्त इमारत म्हणून पालिकेच्या सतरामजलीचा नावलौकिक आहे. बाहेरून लक्ष वेधून घेणार्‍या या इमारतीच्या आतील बाजूचे जाहिरात स्टिकर्समुळे मात्र विद्रुपीकरण सुरू आहे. ‘भिंत तेथे जाहिरात’ अशी अवस्था या इमारतीची झाली असताना प्रशासन या विद्रुपीकरणाकडे दुर्लक्ष करत आहे.

पालिकेच्या एकमेव गगनचुंबी सतरामजली इमारतीकडे जळगावात येणार्‍या प्रत्येकाचे लक्ष वेधले जाते. दर्शनी भागातून खाली-वर जाणार्‍या कॅप्सूल लिफ्ट, प्रशस्त प्रांगणात वाहनांचा ताफा, नागरिकांची वर्दळ या गोष्टींमुळे पालिकेत जाण्याचा मोह प्रत्येकाला होतो. एखाद्या कामासाठी पहिल्यांदाच आलेल्या नागरिकाचा पालिकेत शिरल्यावर मात्र अपेक्षाभंग होतो. कारण सिनेमा थिएटर असल्याप्रमाणे गुटखा खाऊन रंगवलेले कोपरे व प्रत्येक मजल्यावरील भिंतीवर तिथे जाहिरात, स्टिकर व पोस्टर्स दृष्टीस पडतात. तसेच सोसायटीची सभासद नोंदणी व शासनाने वेळोवेळी घेतलेल्या अभियानाची माहितीपत्रके आणि काही ठिकाणी खासगी जाहिरातीही चिकटवण्यात आल्या आहेत. लिफ्ट आणि 13वा मजलादेखील याला अपवाद नाही. आयुक्त व उपायुक्तांचा दररोज वावर असलेल्या या दालनांच्या भिंतींचेही विद्रुपीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, पालिकेच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी बांधकाम व प्रकल्प विभागाकडे सोपवण्यात आली आहे. या विभागाकडून पालिकेच्या इमारतीतील पडझड झालेल्या भागाची दुरुस्ती किंवा रंगरंगोटी केली जात असली तरी, जाहिरातींसह स्टिकर्स आदी काढण्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात असल्याची स्थिती आहे.