आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाच्या हद्दवाढीची माहिती मागवली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - महापालिकेच्या हद्दीत 14 ग्रामपंचायतींचा समावेश करण्याचा ठराव महासभेत झाला होता. त्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींनी महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट होण्यास नकार दिला आहे. यासंदर्भातील माहिती प्रशासनातर्फे विभागीय आयुक्तांना पाठवण्यात आली होती. त्यानंतर आता हद्दवाढीच्या प्रकरणाचा अहवाल शासनाने मागवला आहे.

गेल्या काही वर्षांत शहराचा विकास झपाट्याने होत आहे. महापालिकेच्या हद्दीला लागून असलेल्या महिंदळे, गोंदूर, वलवाडी, अवधान ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या वसाहतींचा आता धुळे शहरात समावेश झाला आहे. शहरापासून सुमारे चार ते पाच किलोमीटर अंतरावर मोठय़ा प्रमाणात नवीन वसाहती निर्माण झाल्या आहेत. या वसाहती शहरालगत असलेल्या सुमारे 13 ते 14 ग्रामपंचायतींच्या हद्दीत समाविष्ट आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांना कोणत्याही नागरी सुविधा उपलब्ध होत नाहीत. शहरालगत असलेल्या 14 ग्रामपंचायतींचा महापालिकेच्या हद्दीत समावेश करण्याचा ठराव महासभेत झाला होता. ग्रामपंचायतींचा महापालिकेच्या हद्दीत समावेश झाल्यास महापालिकेचे उत्पन्न वाढणार आहे ; परंतु विविध ग्रामपंचायतींनी ठराव करून महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट होण्यास नकार दिला आहे. यासंदर्भातील माहिती महापालिका प्रशासनाने विभागीय आयुक्तांना पाठविली आहे. त्यानंतर आता शासनाच्या नगरविकास विभागाने यासंदर्भातील प्रस्तावाची माहिती मागविली आहे. त्यामुळे हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.