आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Municipal Corporation Election Bogus Voter Issue Jalgaon

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापालिका निवडणुक : 70 हजार बोगस मतदारांवर लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - पालिकेच्या तिसर्‍या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींच्या पडताळणीअंती संशयित बोगस मतदारांचा आकडा 70 हजारांवर जाण्याची शक्यता आहे. दिलेल्या पत्त्यावर रहिवास नसणे, छायाचित्र नसणे अशा मतदारांचा यात समावेश आहे. अशा मतदारांची नावे यादीतून वेगळी करण्यासाठी सॉफ्टवेअरची मदत घेतली जात आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार याद्यांसदर्भात आलेल्या हरकतींची तपासणी करून अंतिम मतदार याद्या शनिवारी प्रसिद्ध होणार आहेत. प्रशासनास याद्यांसदर्भात एकूण 3 हजार 281 हरकती प्राप्त झाल्या होत्या. या हरकतींची दखल घेत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पालिका कर्मचार्‍यांनी तपासणी केली. तपासणीनंतर संबंधित पत्त्यावर आढळून न आलेल्या मतदारांची नावे चिन्हांकित केली जात आहेत. तपासणीनंतर अद्ययावत झालेल्या याद्यांच्या छपाईचे काम शुक्रवारपासून सुरू झाले आहे.

शनिवारी सकाळी पालिका इमारतीमध्ये अंतिम मतदार याद्या पाहण्यासाठी उपलब्ध होतील. संशयित मतदारांच्या नावासमोर विशिष्ट चिन्ह अंकित केले जाणार आहे. एकूण साडेतीन लाख मतदारांपैकी किती मतदार चिन्हांकित आहेत, याचा आकडा काढण्यासाठी प्रशासनातर्फे सॉफ्टवेअरचा उपयोग केला जात आहे.

शांतता भंग होण्याची भीती
जिल्हा प्रशासनाकडून शहरातील 66 हजार 733 संशयित मतदारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. पालिका निवडणुकीच्या यादीतही अशी नावे आहेत. प्रत्येक वॉर्डात दोन ते चार हजार बोगस मतदारांची नावे असल्याने याची विशेष यादी तयार करण्याची मागणी भाजपचे महानगराध्यक्ष सुरेश भोळे यांनी केली. तसेच बोगस नावांमुळे निवडणुकीच्या दिवशी शांतता भंग होण्याची शक्यता असल्याने ही नावे वगळण्याची मागणी उल्हास साबळे यांनी केली आहे.