आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचे दुरावलेले नेते येणार एकत्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जळगाव महापालिकेची आजची स्थिती पाहता मतदारांना नवीन पर्याय देण्याची गरज असून राष्ट्रवादीच्या माध्यमातून पर्याय देण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे. पद नाही म्हणून नाराज होऊन चालणार नाही. त्यामुळे आम्ही आजी माजी आमदार, खासदार पालिकेच्या दृष्टीने कामाला लागणार असल्याचे माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. असे झाल्यास पुन्हा जैन गटाच्या विरोधात राष्ट्रवादीची संपूर्ण ताकद लागलेली पाहायला मिळणार आहे.

राष्ट्रवादीतील गटातटाच्या राजकारणामुळे अनेक माजी आमदार, खासदार व पदाधिकारी पक्षापासून दुरावल्याचे चित्र अनेक दिवसांपासून होते. बैठकांमध्ये सहभागी न होणे यासह निर्णय प्रक्रियेपासून लांब झाल्याने कार्यकर्त्यांमध्येही ताटातूट झाली होती. आमदार गुलाबराव देवकर यांचे मंत्रीपद गेल्यानंतर पुन्हा पक्षांतर्गत हालचाली गतिमान झाल्या आहेत. नवनिर्वाचित राज्यमंत्री संजय सावकारे हे कामाला लागले असून पक्षापासून लांब गेलेले अनेक चेहरे त्यांच्या माध्यमातून पुन्हा प्रवाहात येऊ लागले आहेत. यात माजी पालकमंत्री सतीश पाटील यांच्यासह अँड. रवींद्र पाटील यांचेही नाव चर्चेत आले आहे. डॉ. पाटील यांनी तर येत्या पालिका निवडणुकीत आपण पूर्ण ताकद लावणार असल्याचे ते म्हणाले. यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व आजी माजी पदाधिकार्‍यांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

पद गेले म्हणून जबाबदारी झटकून चालणार नाही. पक्षाने यापूर्वीच आपल्याला भरपूर दिले आहे. त्यात मनपानंतर लोकसभा व विधानसभा निवडणूक असल्याने जळगावची निवडणूक राष्ट्रवादीसाठी खूप महत्त्वाची आहे. पालिकेच्या निवडणुकीसाठी लवकर बैठक घेणे गरजेचे असल्याचे सांगत आपण स्वत: जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक व महानगराध्यक्ष मनोज चौधरी यांच्याशी चर्चा करणार. जळगावकरांना नवीन पर्याय हवा आहे, राष्ट्रवादीच्या माध्यमातून पर्याय देण्याचा प्रय} करून आम्ही सर्व एकत्र येऊन कामाला लागणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.