आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव - महापालिका निवडणुकीत रमेश जैन यांनी खोटी माहिती दिल्याच्या तक्रारीवर कार्यवाही करण्याची आठवण निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना करून दिली आहे. त्यासंदर्भातला अहवाल पाठविण्यासाठी 27 डिसेंबरपर्यंतची मुदतही आयोगाने दिली होती.
महानगरपालिकेच्या निवडणुकीत रमेश जैन यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात खोटी माहिती सादर केल्याची तक्रार प्रभाग क्रमांक 21 ब मधील त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार मुकुंद ठाकूर यांनी केली होती. त्या तक्रारीवर राज्य निवडणूक आयोगाने आवश्यक ती कार्यवाही तत्काळ करून अहवाल पाठविण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांना दिले होते. मात्र, अजूनही त्या संदर्भातला अहवाल मिळाला नसल्याचे आयोगाचे अवर सचिव ध.मा. कानेड यांनी 19 डिसेंबरला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. एकप्रकारे आयोगाने आयुक्तांना तक्रारीवर आवश्यक ती कार्यवाही करण्याची आठवणच या पत्राद्वारे करून दिली आहे. या कार्यवाहीचा अहवाल 27 डिसेंबरपर्यत निश्चितपणे सादर करावा, असे निर्देशही आयुक्तांना देण्यात आले आहेत.
प्राथमिक अहवाल सादर : राज्य निवडणूक आयोगाने रमेश जैन यांच्या संदर्भातील अहवाल प्रशासनाकडे मागितला होता. प्राथमिक अहवाल गेल्या आठवड्यातच पाठवण्यात आला आहे. 31 डिसेंबरनंतर जोड अहवाल सादर केला जाणार असल्याचे उपायुक्त अविनाश गांगोडे यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.