आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्यानाचा विकास निवडणुकीपूर्वीच का?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - गेल्या 43 वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या मोकळ्या जागेवर अवघ्या 25 दिवसांत एक सुसज्ज उद्यान विकसित करण्याचा विक्रम नगरसेवक राजकुमार अडवाणी यांच्याकडून केला जात आहे. त्यामुळे एवढी वर्षे प्रलंबित असलेल्या उद्यानाचा विकास निवडणुकीच्या तोंडावरच पूर्ण करून दाखवण्याचा प्रयत्न का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नगरसेवकांमध्ये काम करण्याची धडाडी आहे; पण ती साडेचार वर्षे का दिसली नाही? यापूर्वी स्थायी समिती सभापती असल्याने त्यांना वॉर्डातील हे उद्यान विकसित करण्याची संधी होती. त्यासाठी त्यांनी यापूर्वीच का प्रयत्न केले नाहीत? उद्याननिर्मितीचे संपूर्ण श्रेय त्यांचेच असेल, तर त्यांनी हा प्रयत्न यापूर्वी का केला नाही? उद्यानाचा विकास आमदार निधीतून होत आहे. हा निधी वापरणे यापूर्वीदेखील शक्य होते.

दोघा आमदारांचा निधी
आमदार सुरेश जैन, मनीष जैन या दोघांचा निधी या उद्यानाच्या विकासासाठी वापरण्यात येत असल्याने आगामी निवडणूक काँग्रेस आणि खान्देश विकास आघाडी एकत्रितपणे लढवणार असल्याचा संदेशही यानिमित्ताने दिला जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रचारासाठी मुद्दा
निवडणुकीत ऐनवेळी प्रचारात उद्यानाच्या विकासाचे ताजे उदाहरण उभे करण्यासाठीच हा प्रयत्न असण्याचीही शक्यता आहे. राखीव जागेमुळे अडवाणी या वॉर्डात पुढची निवडणूक लढवणार नाहीत. त्यामुळे ते दुसर्‍या वॉर्डाच्या शोधात आहेत. जुन्या वॉर्डातील हे ‘ताजे’ काम त्यांना नव्या वॉर्डात लाभदायी ठरण्याची शक्यता आहे.