आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रिपदापाठोपाठ निरीक्षकही बदलले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिकेची जबाबदारी असलेल्या गुलाबराव देवकर यांचे मंत्रिपद जाताच पक्षाचे महानगरचे निरीक्षकही बदलले आहेत. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी नियुक्त झालेले सुभाष सोनवणे यांच्याऐवजी पूर्वीचे निरीक्षक रंगनाथ काळे यांच्यावर महानगरच्या निरीक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. चार महिन्यांपूर्वी त्यांच्याकडील ग्रामीणचे निरीक्षक पद काढण्याच्या राजकीय घडामोडीनंतर पुन्हा हा बदल करण्यात आला आहे.

यापूर्वी महानगरचे निरीक्षक म्हणून कामगिरी केलेले सोयगाव येथील रंगनाथ काळे यांची गेल्या वर्षी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ग्रामीणचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्याकडील निरीक्षकपद काढून र्शीराम शेटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर महानगरचे निरीक्षक म्हणून सुभाष सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली होती. देवकरांचे मंत्रिपद गेल्यानंतर पक्षातील राजकीय समीकरणे बदलाची चिन्हे तयार होण्यापूर्वीच रंगनाथ काळे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष बदलापूर्वीच मधुकर पिचड यांनी त्यांच्यावर जळगाव महापालिकेची जबाबदारी सोपविली आहे. राज्यमंत्रिपद सावकारेंकडे येताच देवकरांच्या नेतृत्वात नियुक्त करण्यात आलेल्या सोनवणेंऐवजी रंगनाथ काळे यांच्या नियुक्तीमागे पक्षात राजकीय मीमांसा केली जात आहे.

खान्देश विकास आघाडीतर्फे 128 अर्ज वितरित
पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी खान्देश विकास आघाडीतर्फे अर्ज वितरण सुरू असून, तीन दिवसांत 128 इच्छुकांनी अर्ज नेले आहेत. तसेच पुढील आठवड्यापासून अर्ज भरून येण्यास सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जोमाने निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या खान्देश विकास आघाडीतर्फे उमेदवार चाचपणी सुरू आहे. तसेच आघाडीचे अध्यक्ष रमेश जैन व गटनेते नितीन लढ्ढा यांच्यासह प्रमुख पदाधिकार्‍यांकडून आठवडाभरापासून इच्छुकांशी चर्चेला सुरुवात करण्यात आली आहे. मंगळवारपासून इच्छुकांना उमेदवारी अर्ज वितरित करण्यात येत आहेत. त्यानुसार इच्छुकांनी पहिल्या दिवशी 52, बुधवारी 48 व गुरुवारी 28 अर्ज नेले असून, पुढील आठवड्यात अर्ज भरून येण्याची शक्यता पदाधिकार्‍यांनी वर्तवली आहे.

काँग्रेसतर्फे राखीव प्रभागांची चाचपणी सुरू
महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात कॉँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागातर्फे राखीव प्रभाग क्रमांक दोनमध्ये बैठक घेण्यात आली. या वेळी मागासवर्गीयांना कॉँग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे समजावण्यासोबत आगामी काळात कसे काम करावे, हे सांगण्यात आले. तसेच उमेदवारांची चाचपणी करून त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतले. या वेळी अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष निनाजी गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. या वेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.