आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवारपासून अर्ज विक्रीचा निर्णय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नेमकी काय असेल? याबाबत खुद्द पक्षाचे पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारही संभ्रमात आहेत. आजी-माजी पालकमंत्र्यांची बैठक होणार की नाही याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली असताना अखेर मंगळवारी ही बैठक पार पडली. दोघांच्या बैठकीचे साक्षीदार म्हणून जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. शुक्रवारपासून रविवारपर्यंत अर्ज विक्री करून त्यानंतर मुलाखती घेण्याइतपतचा निर्णय या बैठकीत झाल्याचा जिल्हाध्यक्षांचा दावा आहे.

माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर आणि पालकमंत्री संजय सावकारे यांच्या संयुक्त नेतृत्वात पालिका निवडणूक लढवण्याबाबत पक्षात बर्‍यापैकी वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी दोघांची बैठक अवघ्या 5 मिनिटांत आटोपली. त्यानंतर रविवारीदेखील बैठकीचा मुहूर्त न साधता आल्याने मंगळवारी अखेर गुलाबराव देवकरांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात पालकमंत्री संजय सावकारे यांच्यासोबत बैठक झाली. दीड तास निवडणुकीवर चर्चा झाली.

5 जुलैपर्यंत अर्ज विक्री
शुक्रवारपासून राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज वितरित करण्यात येतील. 5 जुलैपर्यंत अर्ज वितरित करून त्यानंतर प्रमुख पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत मुलाखती घेऊन उमेदवार निश्चित करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.