आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Employees Strike Issue At Jalgaon

पालिकेचा संप चिघळला : सर्वांचेच पगार करण्याची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पगार आणि पेन्शन मिळावे, या मागणीसाठी सोमवारपासून संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून अत्यावश्यक सुविधांसह उत्पन्न मिळणाऱ्या विभागाचे कामकाज सुरू केले होते. मात्र, डीआरटीने आपत्कालीन परिस्थितीसाठी िदलेल्या तीन कोटी िनधीतून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे पगार करण्याचे आश्वासन उपमहापौरांसह काही पदाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन चिघळले. ठराविक कर्मचाऱ्यांचे नव्हे तर सर्वांचे पगार करा, अशी मागणी करत दुपारी १.३० वाजता पालिकेचे सर्व विभाग बंद करण्यात आल्याने आंदोलन चिघळले आहे.

डीआरटी कोर्टाने पालिकेची सर्व खाती ऑगस्टपासून गोठवली आहेत. त्यामुळे पालिकेच्या हजार २१२ कर्मचाऱ्यांचे जुलै, ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे पगार-पेन्शन झालेले नाही. घेतलेल्या कर्जाशी कर्मचाऱ्यांचा संबंध नसल्याने पगार-पेन्शन अदा करावे, या मागणीसाठी सोमवारपासून आंदोलन सुरू केले आहे. आपत्कालीन परिस्थितीच्या उपाययोजनेसाठी मिळालेल्या तीन कोटीच्या िनधीतून सफाई कामगारांचे पगार आणि डिझेलचे बिल अदा करणे शक्य आहे. या मुद्यावरून उपमहापौर सुनील महाजन, माजी महापौर विष्णू भंगाळे, माजी स्थायी सभापती कैलास सोनवणे, चेतन शिरसाळे, अजय पाटील, गणेश सोनवणे यांनी आंदोलनकर्त्यांशी प्राथमिक चर्चा केल्याचा विपरीत अर्थ काढत आंदोलकांमध्ये फूट पाडली जात असल्याची अफवा पसरून दुपारी १.३० वाजता पालिकेचे सर्व विभाग बंद करत कर्मचारी खाली उतरले. यानंतर गुरुवारीदेखील आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

पालिकेचा खुलासा
अफवेनंतरसर्व विभागाचे कामकाज बंद करण्यात आल्याने प्रशासनाला खुलासा करावा लागला. बँक खाती गोठवल्याने कोणाचेही पगार होणे शक्य नाही. त्यामुळे अफवांवर विश्‍वास ठेवता कर्मचाऱ्यांनी पूर्ववत काम सुरू करावे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

डीआरटीविरोधातन्यायालयात अपील
डीआरटीच्याकारवाईला स्थगिती मिळवण्यासाठी पालिका प्रशासनाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. गुरुवारी यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पालिकेने राज्य शासनाला पत्र पाठवले असून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याची िवनंती केली आहे.

संघटना प्रतिनिधी मुंबईकडे रवाना
डीआरटीतखाती गोठवल्यासंदर्भात गुरुवारची तारीख दिली आहे. कर्मचारी संघटनेतर्फे अपील दाखल केले. बाजू मांडण्यासाठी अभा सफाई मजदूर काँग्रेस संघटनेचे पदाधिकारी बुधवारी मुंबईला रवाना झाले.