आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका निधीतील कामांना आयुक्तांचा ब्रेक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिकेवरील कर्जाचा डोंगर त्यात पगाराचेही वांधे असल्याने आर्थिक स्थिती नाजूक असल्याचे कारण पुढे करीत आयुक्त संजय कापडणीस यांनी पालिका फंडातील विकासकामांना ब्रेक लावला आहे. अति महत्वाचे काम असले तरच त्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे प्रभाग समितीच्या माध्यमातून येणारी कामे थांबली आहेत.

गेल्या पंधरा वर्षात वेगवेगळ्या कारणांसाठी घेतलेल्या कर्जाचा आकडा 300 कोटींपेक्षा जास्त आहे. त्याची परतफेड करणे कठीण होत असल्याने डीआरटी कोर्टाकडून हुडकोची रक्कम भरण्यासाठी मालमत्तांवर टाच आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अतिशय हलखीची स्थिती असल्याची जाणीव झालेल्या आयुक्त संजय कापडणीस यांनी धोरणात्मक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.