आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापालिका करणार सौरऊर्जा निर्मिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - महापालिकेला वीजबिलापोटी दरमहा जवळपास एक कोटी रुपये खर्च करावा लागत आहे. हे वीजबिल कमी करण्यासाठी मनपा उपाययोजनेच्या शोधात आहे. त्यात पथदिव्यांचे वीजबिल कमी करण्यासाठी एलईडी पथदिव्यांचा प्रस्ताव आहे. तर दुसरे म्हणजे साक्री तालुक्यात टिटाणे शिवारात पवनऊर्जा प्रकल्प उभारून त्यातून वीजनिर्मिती करण्याचाही प्रकल्प आहे. त्यासाठी प्राथमिक टप्प्यातील पूर्तता करून शासनाकडून चार हेक्टर जमीन उपलब्ध झाली आहे. तर आता पवनऊर्जा एेवजी तेथे सौर पॅनल उभारून सौरऊर्जेची निर्मिती करण्याचा प्रस्ताव आहे. यापूर्वीच्या प्रस्तावासाठी विविध विभागांचे ना हरकत दाखले घेऊन तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला होता. आता त्यात सौरऊर्जेचा प्रस्ताव दिला असून, जिल्हाधिकाऱ्यांकडून तो शासनाकडे पाठवण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...