आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुलांच्या जागांमधून पालिकेला १०० काेटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिका कर्जमुक्तीसाठी अाता सत्ताधारी विराेधकांनी हातातहात घेऊन कामाला सुरुवात केली अाहे. पालकमंत्री एकनाथ खडसेंच्या सूचनेनंतर खाविअाने वेगवेगळ्या पर्यायांचाही विचार सुरू केला अाहे. घरकुलांच्या अाठ जागांच्या माध्यमातून किमान १०० काेटी मिळावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात अाहे. हाच प्रस्ताव घेऊन पुढच्या अाठवड्यात खाविअाचे नेते पुन्हा खडसेंच्या भेटीला जाणार अाहेत.

खान्देश विकास अाघाडीच्या नेत्यांनी मुक्ताईनगर येथे पालकमंत्री खडसेंची भेट घेतल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात अालेली मरगळ झटकली गेली अाहे. महासभेतील ठरावानंतर प्रशासनानेही या कामाला गती दिली अाहे. घरकुलांच्या अाठ जागांपैकी काही जागांवर बांधकाम अपूर्णावस्थेत अाहे; तर काही जागांवर अद्याप बांधकाम सुरू हाेऊ शकलेले नाही. या जागांची माहिती घेत त्या ‘म्हाडा’ला देण्याची तयारी सुरू अाहे. यासाठी पालकमंत्री खडसेंनीच पुढाकार घ्यावा, असाही अाग्रह खाविअाकडून व्यक्त केला जात अाहे. गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेली दरी कमी झाल्याने खाविअाचे नेते पुन्हा खडसेंच्या मार्गदर्शनासाठी जाणार अाहेत. या दृष्टीने उपायुक्त प्रदीप जगताप यांनीही प्रकरणाचा अभ्यास सुरू केला अाहे.

४०काेटींचे उत्पन्न : म्हाडासाेबतबाेलणी झाल्यास रेडी रेकनरनुसार अाठ जागांच्या हस्तांतरणातून पालिकेला ४० काेटी ५१ लाख ६६ हजार रुपये मिळू शकतात. अाठही जागांचे क्षेत्रफळ उर्वरित.पान १२
या जागांचा समावेश

पिंप्राळा,मेहरूण गावठाण, समतानगर, अासाेदा राेड, खेडी, फुकटपुरा, तांबापुरा यासाह इच्छादेवी चाैकापासून भुसावळ राेडवरील अपूर्णावस्थेतील घरकुलांचाही समावेश अाहे.

खडसेंना भेटणार
^घरकुल तसेच हुडकाेसाेबत एकरकमी परतफेडीच्या प्रस्तावासंदर्भात येत्या अाठवड्यात पुन्हा एकनाथ खडसेंची भेट घेणार अाहे. नितीनबरडे, गटनेते, खविअा