आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेवर पडणार महामार्ग दुरुस्तीचा बाेजा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे चाैपदरीकरण अाणि बायपास झाल्यानंतर शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या दुरुस्तीची जबाबदारी झटकून ती महापालिकेच्या माथी मारण्याची तयारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने चालवली अाहे. शहर हद्दीतील महामार्गावर समांतर रस्ते बनवण्यासाठी पालिकेने उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राची त्यासाठी मदत घेण्यात अाली अाहे. अाधीच अार्थिक अडचणीत असलेल्या पालिकेवर ही जबाबदारी पडल्यास सध्याच्या महामार्गाची परिस्थिती जुन्या महामार्गासारखी (निमखेडी राेड) हाेण्याची भीती अाहे.
महामार्गावर जळगाव शहरालगत बायपास झाल्यास संपूर्ण अवजड वाहतूक शहराच्या बाहेरून जाईल, त्यामुळे शहरातून जाणाऱ्या महामार्गाची गरज नसल्यामुळे शहर हद्दीतील महामार्ग महापालिकेला देखरेख अािण दुरुस्तीसाठी हस्तांतरित करण्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रस्ताव तयार केला अाहे.
प्राधिकरणाकडेच जबाबदारी
रस्तामहापालिकेला हस्तांतरित केल्यानंतरही मालकी प्राधिकरणाचीच राहणार अाहे. त्यामुळे रस्त्याची मालकी कायम ठेवणाऱ्या प्राधिकरणानेच या रस्त्याच्या मेंटेनन्सची जबाबदारी उचलणे अावश्यक अाहे.
-बायपास झाल्यानंतर शहरातील महामार्गावरून अवजड वाहतूक हाेणार नाही. हा महामार्ग शहरासाठीच अधिक उपयुक्त असल्याने ताे महापालिकेला हस्तांतरित केला जाईल. पालिका महामार्गावरील समांतर रस्तादेखील करणार अाहे. त्यांनी तशी अार्थिक तरतूददेखील केली अाहे. यू.जे.चामरगाेरे,प्रकल्पसंचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
वर्दळ कायम राहणार
महामार्गप्राधिकरणाच्या दाव्यानुसार अवजड वाहतूक बंद हाेणार अाहे. परंतु, अाैरंगाबाद रस्त्याने येणाऱ्या गाड्या, एमअायडीसीतील अाणि स्थानिक उद्याेगांच्या धुळ्याकडे जाणाऱ्या मालमाहू गाड्या शहरातील महामार्गाचा उपयाेग करणार अाहेत. तर धुळ्याकडून एमअायडीसी अाणि अाैरंगाबाद, पाचाेऱ्याकडे जाणाऱ्या गाड्यांनादेखील हाच महामार्ग वापरावा लागणार अाहे.
पालिकेला देखरेख अशक्य
जळगावशहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग गिरणा नदीपूल ते खेडीजवळील टीव्ही सेंटरपर्यंत पालिकेच्या हद्दीत येताे. शहराचे दाेन भाग करणाऱ्या या महामार्गावर अधिक वर्दळ असते. त्यामुळे त्याची दरवर्षी दुरुस्ती करणे, अतिक्रमण राेखणे, क्राॅसिंगच्या रस्त्यांचा मेंटनन्स करणे यासाठी येणारा खर्च पालिकेला करणे अशक्य अाहे. शहरातील इतर रहदारीचे रस्ते दुरुस्त करणे शक्य नसताना, त्यात अाणखी एका माेठ्या रस्त्याची भर पडणार अाहे. शहरातील इतर रस्त्यांच्या तुलनेत महामार्गाच्या दुरुस्तीसाठी राखीव खर्चात दुपटीने वाढ करावी लागेल.
निमखेडी रस्त्यासारखी अवस्था
शहरातूनजाणारा जुन्या राष्ट्रीय महामार्गाची (निमखेडी राेड) सध्या अत्यंत वाईट अवस्था अाहे. निमखेडी राेड म्हणून परिचित असता, रस्ता १९८०मध्ये तत्कालीन नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात अाला. मेंटनन्सअभावी गिरणा नदीवर असलेला पूल खचल्यामुळे या महामार्गावरील वाहतूक बंद झाली अाहे. मालधक्क्यामुळे दरराेज शेकडाे गाड्यांची वर्दळ असणाऱ्या या रस्त्यावर अनेक खड्डे पडलेले अाहेत. संपूर्ण रस्ताच गायब झाला असून उडणारा धूर, धुलिकणांना परिसरातील नागरिकांना खूप त्रास होत अाहे. या रस्त्याची स्थिती पाहता महामार्ग पालिकेकडे हस्तांतरित करण्याची इच्छा नागरिकांची अाहे.