आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई टाळण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी; महापालिका प्रशासनाच्या हालचाली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिका कर्जमुक्तीसाठी आता सर्वच स्तरावर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मुदत संपलेल्या गाळेधारकांवर जास्त बोझा नको म्हणून पाच पट दंडाचा आदेश रद्द करून केवळ रेडिरेकनर दरानुसार भाडे आकारणी केली जातेय. परंतु एवढी सूट देऊनही तीन वर्षांचे भाडे देणाऱ्या गाळेधारकांना काढून टाकण्याची तयारीही प्रशासनाने सुरू केली आहे. त्यामुळे गाळेधारकांजवळ कारवाई टाळण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी आहे.

हुडकोकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी प्रशासन प्रस्तावांवर प्रस्ताव तयार करीत असून मंत्रालयातही येत्या आठवड्यात बैठक होणार आहे. एकीकडे कर्जफेडीसाठी प्रशासन राजकीय पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे पालिका आपल्या हक्काचा कर वसुलीसाठी धडपड करत आहे. कर्जफेडीसाठी एकमेव आशेचा किरण ठरलेल्या मुदत संपलेल्या व्यापारी गाळ्यांच्या माध्यमातून कर आकारणीची तयारी सुरू केली आहे. १८ व्यापारी संकुलातील २१७५ गाळ्यांची मुदत संपली आहे. त्यात १० मार्केटची २०१२ मध्ये तर काही मार्केटची २०१३ २०१४ मध्ये मुदत संपली आहे. २०१३ मध्ये मुदत संपलेल्या गाळेधारकांना यापूर्वी पाच पट दंडाचा आदेश मागे घेत रेडिरेकनर दरानुसार भाडे आकारणीचे सुचनापत्र देण्यात आले असून यासाठी ३१ मार्च २०१५ ही अंतिम तारीख आहे.
०५ पटदंडाचा आदेश मागे
२१७५ गाळ्यांची मुदत संपली
१८व्यापारी संकुल

मनपाचे नुकसान
गेल्यातीन वर्षांपासून व्यापारी संकुलातील गाळेधारक भाडे देत नसल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे, तर पालिका भाडे घेत नसल्याचे गाळेधारकांचे म्हणणे आहे. भाडेकरातून पालिकेला मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध होणार आहे. तसेच तीन वर्षांपासून भाडे मिळत नसल्याने पालिकेचेही आर्थिक नुकसान होत असून त्याचा परिणाम शहरातील िवकास कामांवर होत आहे.

अन्यथा कारवाई
तीनवर्षांचे भाडे आकारणीसाठी सुचनापत्र बजावण्यात आल्या नंतर आता प्रशासनाने दोन महिने वेट अॅण्ड वॉचची भूमिका बजावण्याचे ठरवले आहे. त्यानंतरही भाड्याची रक्कम भरल्यास संबंधितांना ८१ नुसार नोटीस बजावण्यात येणार आहे. यापुर्वीही अशाच प्रकारची नोटीस बजावण्यात आल्यानंतर कायदेशीर लढाई सुरू झाली होती. ८१ च्या नोटीसमुळे महानगरपालिकेच्या जागेतून संबंधित व्यक्तींना काढून टाकण्याचा अधिकार असतो.