आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Mayor Selection Process Dhule

महापौर, उपमहापौर निवड अर्जाची आज अंतिम मुदत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी अर्ज जमा आणि विक्रीची उद्या सोमवारी अंतिम मुदत आहे. मंगळवारी (दि.31) महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक होणार आहे. महापालिकेची तिसरी सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली आहे.

निवडणुकीनंतर महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक होत आहे. दि. 26 ते 30 दरम्यान यासाठी अर्ज जमा करण्यात येत आहेत. त्यात उपमहापौरपदासाठी दोन अर्ज घेण्यात आले आहेत. तर महापौरपदासाठी कुणीही अर्ज घेतलेले नाहीत. त्यामुळे उद्या सोमवारी शेवटच्या दिवशी महापौरपदासाठी अर्ज जमा होणार आहेत. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला बहुमत प्राप्त झाले आहे. त्यात महापौरपदासाठी जयश्री अहिरराव यांचे नाव चर्चेत आहे. उद्या सोमवारी सकाळी 11 वाजता यासाठी महापालिकेत विशेष सभा घेण्यात येणार आहे.