आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Mns Candidate Work Jalgaon

अडचणीतही करू कामे; मनसेच्या पदाधिकार्‍यांनी दिले आयुक्तांना निवेदन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - आर्थिक स्थिती खालावलेली असल्याने किमान दोन वर्षे तरी पालिका निधीतून विकासकामे करणे शक्य नसल्याचे प्रशासनाचे मत आहे. या परिस्थितीची जाणीव ठेवत दोन वर्षे पेमेंटसाठी अडून न बसता विकासकामे करण्याची तयारी मनसेने दर्शवली आहे. यासंदर्भात गटनेते ललित कोल्हे यांच्यासह सर्व नगरसेवकांनी आयुक्तांना गुरुवारी निवेदन दिले.

मनपाची आर्थिक स्थिती चांगली नसली तरी विकासकामे झाली पाहिजे, अशी अपेक्षा गटनेते कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. याबाबत आयुक्त यांच्याशी सर्व नगरसेवकांनी अर्धा तास चर्चा केली. या वेळी नगरसेविका सिंधू कोल्हे, मिलिंद सपकाळे, नितीन नन्नवरे, संतोष पाटील, पद्मा सोनवणे, पार्वताबाई भील, लीना पवार, खुशबू बनसोडे, कांचन सोनवणे, मंगला चौधरी, सुनील पाटील उपस्थित होते.