आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Municipal Corporation Will Take Charge Of 59 Spaces

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

५९ जागा ताब्यात घेणार, पालिका अायुक्तांकडून जागांची पाहणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महापालिकेनेसमाजहित डोळ्यासमोर ठेवून संस्थांना दिलेल्या जागांचा सर्रास व्यावसायिक वापर सुरू असल्याचे आयुक्त संजय कापडणीस यांनी कबुल केले आहे. नागरिकांच्या वाढत्या तक्रारींमुळे गुरुवारी प्रत्यक्ष जागांची पाहणी केली. त्यापैकी ५९ जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून अंतिम नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे कमाईचे साधन झालेल्या जागा संस्थांच्या हातून जाणार आहेत.

महापालिकेच्या संपूर्ण शहरात सुमारे ३०० ते ३५० खुल्या जागा असून त्यापैकी ८० टक्के जागा ह्या तत्कालीन नगरपालिका महापालिकेने वेगवेगळ्या सामाजिक, सांस्कृतिक मंडळ, संस्थांना समाजोपयोगी उपक्रमासाठी कराराने दिल्या होत्या. परंतु या जागा सध्या कमाईचे साधन म्हणून वापर होत आहे. ब-याच ठिकाणी मंगल कार्यालय, सभागृह बांधून त्याचे हजारो रुपये भाडे आकारले जाते. विशेष म्हणजे या जागा त्या त्या भागातील नागरिकांच्या वापरासाठी देण्यात आल्या होत्या. यासंदर्भात नगररचना विभागाने पहिल्या टप्प्यात ५९ जागांची माहिती घेऊन त्यांना नाेटीस देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पुढे काहीच झाले नाही. नागरिकांच्या तक्रारी वाढतच राहिल्या. महापालिका प्रशासन हातावर हात धरून बसून हाेते. गुरुवारी दुपारी अचानक आयुक्त कापडणीस यांनी रूस्तमजी शाळा, सेंट लॉरेन्स शाळा प्रतापनगरातील स्वामी समर्थ मंदिरासह विविध जागेची पाहणी केली.

असाहोतोय वापर
शहरातीलब-याच जागांवर अनेक संस्थांनी मंगल कार्यालय, हॉल, व्यायाम शाळा, शैक्षणिक संस्था, पतसंस्था उभारल्या आहेत. त्यातून गरजूंकडून फी आकारली जाते पैसा कमावला जातोय.

भाडे आकारणार
आदर्शनगरातीलसेंट लॉरेन्सची जागा महापालिकच्या मालकीची आहे. त्यामुळे जागा ताब्यात घेता या संस्थेकडून वार्षिक भाडे आकारणी तसेच प्रीमियम घेण्यात येणार आहे. तसेच ज्या कालावधीपासून जागा ताब्यात आहे, तेव्हापासूनचे भाडे आकारण्याचा पालिका प्रशासन विचार करीत असल्याची माहिती नगररचना सहायक संचालक निकम यांनी दिली

८१ ची नाेटीस देणार
ज्यासंस्था कराराचा भंग करून जागेचा वापर करताय. तसेच ज्या लोकांसाठी त्या जागा आहेत, त्यांनाच जागा वापरास अटकाव करतात, अशा सर्वच जागा ताब्यात घेण्याच्या दृष्टीने पालिकेने पाऊल उचलले आहे. यासंदर्भात संस्थांना ८१ब ची अर्थात जागा रिकामी करण्याची नोटीस दिली जाणार आहे. नोटीस बजावणे म्हणजे संस्थेला जागेतून निष्कासित करणे हाेय.