आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation,latest News In Divya Marathi

निष्ठावंतांना पदाचे गाजर, कराराच्या मुद्यावरून गाळेधारक विचलीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर दोनच दिवसात महापौर, स्थायी समितीसह विविध समित्यांची मुदत संपत आहे. त्या मुळे या निवडणुकीत साथ देणा-या निष्ठावंत कार्यकर्त्यांना महापालिकेत पदांची बक्षिसी दिली जाणार आहे. सर्वच पक्षांना कमी-अधिक संख्येने या पदांवर आपले सदस्य पाठवता येणार असल्याने कार्यकर्त्यांच्याही आशा पल्लवीत झाल्या आहेत. महापालिकेच्या स्थायी समितीची मुदत १७ऑक्‍टोंबर रोजी संपत आहे. मात्र,नवे सदस्य निवडीसंदर्भात कोणत्याही हालचाली करण्यात आलेल्या नाहीत. विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर नवे सदस्य नेमून नाराजी ओढवून घेण्यापेक्षा नियुक्तीचे घोंगडे भिजतच ठेवण्यात आल्याची स्थिती आहे.
महापौपदासाठी 10 महिन्यांचा कालावधी ठरला होता, िवधानसभा निवडणूक झाल्यावर या पदावर नव्या व्यक्तीला संधी देता येणे शक्य अाहे. त्याचप्रमाणे एक स्वीकृत सदस्य, स्थायी समितीमध्ये अाठ सदस्य, प्रभाग समितीमध्ये जवळच्या कार्यकर्त्यांना सामावून घेता येणार अाहे. त्यामुळे उमेदवारांकडून कार्यकर्त्यांना ‘काम करा फळ मिळेल’ असे गाजर दाखवले जात आहे.
निवड लवकरच
स्थायीसमिती स्थापन होऊन वर्ष पूर्ण झाल्यावर निम्मे सदस्‍य निवृत हातोता. नवीन सदस्य निवडीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होईल. - निरंजनसैंदाणे, नगरसचिव
काय म्हणतो कायदा?
महाराष्ट्रमहापालिका अधिनियमाच्या कलम २० (३) नुसार स्थायी समितीच्या सदस्यांपैकी निम्मे सदस्य पुढील प्रत्येक वर्षी पोटकलम (2) मध्ये उल्लेख केलेली महापालिकेची पहिली सभा ज्या महिन्यात होईल त्या-त्या महिन्याच्या पहिल्या तारखेस दुपारी निवृत्त होतील.