आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवकांची शरणागती! पोलिसांसमोर विरोधी पक्षनेत्याच्या दालनातून काढून दिली फाइल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - मनपातून फाइल चोरून नेल्याचा आरोप असलेले शविसेनेचे नगरसेवक नरेंद्र परदेशी संजय गुजराथी बुधवारी शहर पोलिस ठाण्यात शरण आले. त्यांना पोलिस व्हॅनमधून बंदोबस्तात महापालकिेत आणण्यात आले. या वेळी दोन्ही नगरसेवकांनी विरोधी पक्षनेत्याच्या दालनातून संबंधित फाइल काढून दलिी. पोलिसांनी पंचनामा करून फाइल ताब्यात घेतली. या वेळी मनपाच्या आवारात शविसैनकिांची गर्दी झाली होती. दोघा नगरसेवकांना न्यायालयाने एक दविसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

महापालकिेच्या पाणीपुरवठा योजनेच्या बलिांची फाइल नगरसेवक नरेंद्र परदेशी संजय गुजराथी यांनी परत केली नाही, म्हणून त्यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. काल मंगळवारी घडलेल्या या घटनेनंतर बुधवारीही महापालकिेतील वातावरण तणावपूर्ण होते. सकाळी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. त्याच वेळी सकाळी ११ वाजता शविसेनेचे नगरसेवक नरेंद्र परदेशी, संजय गुजराथी हे शहर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याप्रकरणी स्वत:हून पोलिसांना शरण आले.

या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पोलिस व्हॅनमधून महापालकिेत आणण्यात आले. त्यानंतर विरोधी पक्षनेते संजय जाधव यांच्या दालनात नेण्यात आले. या वेळी त्यांच्यासोबत पोलिस निरीक्षक अनलि वडनेरे होते. विरोधी पक्षनेत्याच्या टेबलाच्या ड्रॉवरमधून काल हिसकावून आणलेली बलिांची फाइल काढून देण्यात आली. पोलिस निरीक्षक अनलि वडनेरे यांनी जागेवरच पंचनामा करून फाइल ताब्यात घेतली. या वेळी महापालकिेच्या आवारात शविसैनकिांची गर्दी झाली होती. या वेळी शविसैनकिांनी घोषणाही दलि्या. दुपारी नगरसेवकांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघा नगरसेवकांना एक दविस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दलिेले आहेत.

फाइल होती दालनातच
पाणीपुरवठायोजनेची फाइल शविसेनेचे नगरसेवक नरेंद्र परदेशी, संजय गुजराथी यांनी घेतल्याच्या कारणावरून मनपातील कर्मचाऱ्यांनी अचानकपणे काम बंद केले. त्यानंतर कार्यालये बंद असल्याने फाइल दालनातच ठेवण्यात आली होती. ती कुठेही घेऊन गेलो नाही. केवळ पाहण्यासाठी ती आणली होती. संजयजाधव, विरोधी पक्षनेते

कर्मचाऱ्यांच्या काळया फिती
महापालकिा कर्मचाऱ्यांना अपशब्द वापरल्याचा निषेध म्हणून मंगळवारच्या घटनेनंतर याचा विरोध करीत आंदोलन केले. तर दुसऱ्या दविशी बुधवारीही काळया फिती लावून निषेध व्यक्त करीत काम सुरू ठेवले आहे. तसेच सुरुवातीला महापालकिेच्या आवारात जमून घोषणा देण्यात आल्या.

नगरसेवकांवर प्रथम गुन्हा दाखल
महापालकिेच्याइतिहासात आतापर्यंत अनेक आंदोलने झाली. त्यात काही आंदोलने आक्रमकपणे झाली. प्रसंगी तोडफोड करण्यापर्यंत, अधकिाऱ्यांना डांबून ठेवण्यापर्यंत झाली आहे. ती नंतर मिटवण्यात आली; परंतु नगरसेवकांवर प्रशासनाकडून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची बहुधा ही पहलिीच वेळ आहे.

असा आहे घटनाक्रम
- सकाळी १० वाजेच्या सुमारास शहर पोलिस ठाण्यात हजर.
- ११ वाजेला पोलिसांसमवेत दोन्ही नगरसेवक महापालकिेत.
- १२ वाजेच्या सुमारास विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयात फाइल सापडल्यानंतर पुन्हा पोलिस ठाण्याकडे रवाना.
बातम्या आणखी आहेत...