आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाने सादर केलेल्या प्रस्तावावर वर्ष उलटले तरी अद्याप काेणताही निर्णय नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीत प्रचंड नुकसान झाले होते. त्यानंतर महापालिकेने शासनाकडे विकास कामांसाठी ३० कोटींचा प्रस्ताव सादर केला होता. परंतु वर्ष उलटले तरी अद्यापही शासनाकडून कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. असाच अनुभव अल्पसंख्याक निधीसाठी कोटी ७५ हजार तसेच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या २५ कोटींच्या निधीबाबत पालिका प्रशासनाला येत आहे. त्यामुळे राज्य शासनालाच शहरातील विकास कामांबाबत सोयरसुतक नसल्याची खंत व्यक्त होऊ लागली आहे.

मनपाने आतापर्यंत विकास कामांसाठी अनेक वेळा प्रस्ताव पाठवूनही शासनस्तरावर त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा अनुभव सातत्याने पालिका प्रशासनाला येतोय. जिल्ह्याला दोन मंत्रिपदे असतानाही जळगाव शहराच्या बाबतीत अजूनही ‘अच्छे दिन’ येत नसल्याने आता उघड चर्चा व्हायला सुरू झाली आहे.

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या विशेष निधीबाबत अजूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे साधी बैठकसुध्दा झालेली नाही किंवा त्यासंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही कळवण्यात आलेले नाही.

कोणत्या कामांची निवड करण्यात आली, याची माहितीही अधिकाऱ्यांना नाही. त्यामुळे पालिका प्रशासनालाही या विकास कामांच्या प्रक्रियेपासून लांब ठेवण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.

२५ कोटींबाबत हालचाली नाही
शहरातगेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती. यात शहरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली होती. झालेल्या नुकसानीसाठी महापालिकेने शहरातील विकास कामांबाबत ३० कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला होता. तसेच महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे असलेल्या अल्पसंख्याक विभागाकडून मिळणाऱ्या निधीसाठी कोटी ७५ लाखांचा निधीचा प्रस्ताव तातडीने मुंबईला मागवण्यात आला होता. आता दोन महिने उलटले तरी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या २५ कोटींच्या निधीबाबत कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे मंत्रालयस्तरावर केवळ प्रस्ताव मागवले जातात, परंतु त्याची पूर्तता होत नसल्याचा अनुभव पालिका प्रशासनाला येऊ लागला आहे.
६० कोटींच्या कामांना शासनाचा खोडा