आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवकाची एसटी चालकास मारहाण; अर्धा तास चक्का जाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- एसटीचा दुचाकीस कट लागल्याच्या कारणावरून नगरसेवकासह तीन जणांनी बसचालकास मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजता गेंदालाल मिल रिक्षा स्टाॅपजवळ घडली. बसचालकाला मारहाण केल्यामुळे नगरसेवकावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी नवीन बसस्थानकात अर्धा तास चक्का जाम अांदाेलन करत एसटी वाहतूक रोखली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात परस्परांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शिवाजीनगर पुलावरून एसटी बसेसची वाहतूक बंद झाल्याने त्या फेऱ्याने जात अाहेत. मात्र, काही दिवसांपासून या वाहतुकीस परिसरातून विरोध केला जात असल्याने याच वादातून ही घटना घडली.

एसटी चालक दिलीप नवल ठाकरे हे (क्र.एमएच-२०-बीएल-१४२५) बस घेऊन यावलहून जळगावकडे येत हाेते. शिवाजीनगरातील गेंदालाल मिल रिक्षा स्टॉपजवळील देशी दारू दुकानासमाेर बसचा जास्मिन राजू पटेल (वय २०) याच्या (क्र.एमएच-१९-बीएक्स-८२०९) दुचाकीस थाेडा कट लागला. या प्रकारामुळे उद््भवलेल्या वादातून नगरसेवक राजू पटेल यांच्यासह तीन ते चार जणांनी बसचालक ठाकरे यांना मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच एसटी कर्मचारी संघटनांनी नवीन बसस्थानकात वाहतूक रोखत चक्का जाम अांदाेलन केले. तसेच जोपर्यंत चालकाला मारहाण करणाऱ्या नगरसेवकावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत बससेवा सुरू करण्याचा पवित्रा घेतला. दुसरीकडे मारहाणीनंतर चालक दिलीप ठाकरे यांनी बस शहर पोलिस ठाण्यात आणली. त्यानंतर एसटी आगाराचे यंत्र अभियंता प्रशांत वासकर, आगारप्रमुख एस.बी.खडसे, वाहतूक निरीक्षक प्रमोद चौधरी, मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनेचे सुरेश चांगरे, मनोज सोनवणे, सोपान सपकाळे, रामभाऊ सोनवणे हेही पाेलिस ठाण्यात दाखल झाले. त्याचप्रमाणे नगरसेवक राजू पटेल जास्मिन पटेल यांच्यासह शिवाजी नगरातील गेंदालाल मिल परिसरातील नागरिकदेखील शहर पाेलिस ठाण्यात दाखल झाले. या वेळी दोघांनी परस्परांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

एसटीवाहतुकीस विरोध
शिवाजीनगरपुलावर क्रॉसबार लावल्यानंतर एसटी बसेस गेंदालाल मिल परिसरातून धावत आहेत. मात्र, यास परिसरातील नागरिकांकडून विरोध केला जात आहे. गेंदालाल मिलजवळील देशी दारू दुकानाजवळ कायम गर्दी असते. येथे वाहनाचा धक्का लागल्यावरून अनेकदा वादाच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, या भागातील युवक नागरिक जाणीवपूर्वक रस्त्यात येऊन अपघात घडवत असल्याचा आरोप बसचालकांनी केला अाहे, तर एसटी चालक बसेस सुसाट चालवत असल्याच्या तक्रारी या भागातील नागरिकांनी पोलिस ठाण्यात केल्या.

३०मिनिटे अांदाेलन
याघटनेच्या निषेधार्थ एसटी चालकांनी आगारात सुमारे ३० मिनिटे बसेस थांबवून चक्का जाम अांदाेलन केले. या वेळी जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक गिरधर निकम सुभाष पाटील यांनी कर्मचाऱ्यांची समजूत काढली. मात्र, हे कर्मचारी नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर ठाम राहिले. या प्रकारामुळे बराच वेळ गाड्या आगारात उभ्या असल्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. मारहाणप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संबंिधत नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात अाल्याने वाहतूक सुरळीत झाली.

परिसरातून बसेस भरधाव वेगाने जातात
एसटीचालकासनुकसानभरपाईची मागणी केल्यावर माझा मुलगा जास्मिन यास वाहक कर्मचारी संघटनेच्या तीन ते चार जणांनी मारहाण केली. परिसरातून बसेस सुसाट जातात. त्यामुळे ही वाहतूक बंद करावी. राजू पटेल, नगरसेवक

विनाकारण मारहाण
दुचाकीचेनुकसानभरून देण्यास तयार असतानाही केवळ ‘या भागातून कसे जातात’ असा दम देत अन‌् ‘कपाळावर टिळा काय लावतोस’ असे म्हणत मारहाण केली. तसेच रिक्षा स्टाॅपजवळ तरुण जाणीवपूर्वक गर्दी करून रस्त्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात. त्याचा अाम्हाला नेहमीच त्रास होतो. दिलीप ठाकरे, बसचालक

जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करतात
गेंदालालमिल परिसरात नागरिक जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करून वाहतूक थांबवण्याचा प्रयत्न करतात. एसटी चालकांना दुसरा मार्ग नाही. त्यामुळे प्रशासनाने बसेससाठी पुलावरून वाहतूक सुरू करावी; अन्यथा उभे गर्डर लावावेत. एसटी कर्मचाऱ्यांनी हा अन्याय कुठपर्यंत सहन करायचा? सुरेशचांगरे, मान्यताप्राप्तकामगार संघटना
बातम्या आणखी आहेत...