आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवक उचलणार अतिक्रमणमुक्तीचा विडा, कारवाई करण्याचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव ; महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला शहरात कारवाई करताना अनेक वेळा लाेकप्रतिनिधींचा अडथळा हाेताे, अशी अाेरड नेहमीच हाेते. या अडचणीला पूर्णविराम देण्यासाठी अन् शहरातील रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी नगरसेवक अाता थेट रस्त्यावर उतरणार अाहेत.
त्यासाठी दाेन टप्प्यांत कारवाई केली जाणार असून, एकही नगरसेवक याप्रकरणी केल्या जाणाऱ्या कारवाईवेळी हस्तक्षेप करणार नसल्याचा निर्धार नगरसेवकांच्या बैठकीत करण्यात अाला. त्यामुळे अाता फक्त प्रशासनाने कारवाईची मानसिकता ठेवण्याची गरज राहणार अाहे.

शहरात गेल्या दहा वर्षांत नव्हते इतके अतिक्रमण दाेन वर्षांत वाढल्याचा ठपका नुकत्याच झालेल्या महासभेत ठेवण्यात अाला. सगळेच राजकीय पदाधिकारी अतिक्रमण निर्मूलन विभागावर भ्रष्टाचाराचे अाराेप करतात. तसेच पथक कारवाई करायला गेले की, फाेन करून अडचणी अाणतात. ही अाता परंपराच झाली अाहे. मात्र, बुधवारच्या सभेत मनसेचे नगरसेवक अनंत जाेशी यांनी अतिक्रमणप्रकरणी हाेणारी कारवाई राेखण्यासाठी काेणीही फाेन करू नये, असे अावाहन केल्यानंतर अाता सत्ताधारी खाविअाने त्याला पाठिंबा दर्शवला अाहे.
उपमहापाैर सुनील महाजन यांच्यासह खाविअाच्या काही नगरसेवकांची बुधवारी सायंकाळी बैठक झाली. जळगावात अाज अतिक्रमण राेखले नाही, तर भविष्यात चालणेही मुश्कील हाेईल अशा गंभीर प्रतिक्रिया या वेळी व्यक्त करण्यात अाल्या. त्यामुळे अापणच अतिक्रमणाच्या कारवाईला बळ द्यावे. त्यासाठी गरज पडल्यास पालिकेच्या पथकासाेबत रस्त्यावर उतरून अतिक्रमणप्रकरणी कारवाईस पाठिंबा द्यावा, असा सूर निघाला.

अाधीरस्ते नंतर पक्की बांधकामे
उपमहापाैरमहाजन यांनी अतिक्रमण निर्मूलन माेहिमेसाठी पालिकेचे सर्वच पदाधिकारी नगरसेवक सकारात्मक मानसिकतेत अाहेत. काेणीही अतिक्रमणधारकांचे समर्थन करणार नाही. तसेच नाेटरी करून दिली म्हणजे ती जागा काेणाच्या मालकीची हाेत नाही, हे अाधी हाॅकर्सना सांगणार अाहाेत. वाहतुकीला अडथळा झाला म्हणजे कारवाई हाेणार हे निश्चित अाहे. दाेन टप्प्यांत ही कारवाई केली जाणार असून, अाधी रस्त्यांवरील अतिक्रमण काढले जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पक्के शेडचे अतिक्रमण हटवण्याचे काम हाती घेतले जाणार असल्याचे सांगितले.

इंदूरदाैऱ्यानंतर माइंड सेट
एकालग्नसाेहळ्यानिमित्त पालिकेचे बरेच नगरसेवक पदाधिकारी इंदूरला गेले हाेते. त्या ठिकाणी वाहतुकीची व्यवस्था, अतिक्रमणमुक्त रस्ते, हाॅकर्सची व्यवस्था याबाबतचे नियाेजन त्यांनी पाहिले. त्यामुळे एवढ्या माेठ्या शहरात हे हाेऊ शकते, तर मग जळगावात का नाही? असा सूर अाता उमटत अाहे.
त्यातून सकारात्मक विचार घेत नगरसेवकांनी अापले ध्येय निश्चित केले अाहे. यापुढे अतिक्रमणधारकांवर कारवाई करू नका म्हणून काेणीही फाेन करणार नसल्याचा निर्धार करण्यात अाला. त्यासाठी अामदार सुरेश भाेळेंनाही विश्वासात घेतले जाणार अाहे.

प्रशासनदेणार पाेलिसांना पत्र : पालिकासभांमधील गाेंधळ डाेळ्यासमाेर ठेवत प्रशासनानेही अतिक्रमण निर्मूलन कारवाईची तयारी सुरू केली अाहे. पाेलिस अधीक्षकांनीही यापूर्वी रस्ते माेकळे करण्यासाठी मनपाला पत्र दिले हाेते. त्यामुळे माेफत पाेलिस बंदाेबस्त मिळावा म्हणून पाेलिस प्रशासनाला मनपाकडून पत्र दिले जाणार अाहे. अतिक्रमण निर्मूलन विभागात सध्या ११ कर्मचारी असून, २५ कर्मचाऱ्यांची गरज अाहे. पाच लाख जनतेच्या शहरात एवढ्या कमी कर्मचाऱ्यांमध्ये माेेठी कारवाई करणे शक्य नसते. त्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवावी लागणार अाहे. नगरसेवकांनी अतिक्रमणमुक्तीसाठी प्रयत्न सुरू केल्यानंतर अाता प्रशासन त्याला कितपत साथ देते? याबाबत खरेच नियाेजन केले जाते की नेहमीप्रमाणे अर्ध्यातच साेडले जाते? हे अागामी काळात स्पष्ट हाेईल.
शहरअतिक्रमणमुक्तव्हावे, ही अामचीही इच्छा अाहे. नगरसेवक फाेन करतात, असा अाराेप हाेताे. त्यामुळे अाता अाम्हीच रस्त्यावर उतरून कारवाईला पाठिंबा देऊ. कारण रस्ते माेकळे हाेणे गरजेचे अाहे. नाेटरी केली म्हणजे जागा काेणाच्या मालकीची हाेत नाही. त्यामुळे हाॅकर्सनीही हे समजून घेतले पाहिजे. सुनील महाजन, उपमहापाैर
जप्त साहित्य परत देणार नाही
अतिक्रमणनिर्मूलन कारवाईत बऱ्याचदा हाॅकर्सचे साहित्य जप्त केले जाते. तसेच महिनाभरानंतर दंड अाकारून ते परत केले जाते. त्यामुळे हाॅकर्स महिनाभरासाठी साेय करून ठेवतात; परंतु अाता मनपरने जप्त केलेले काेणतेही साहित्य परत करण्याचा ठराव करणार अाहे. तसेच अातापर्यंत जप्त केलेल्या साहित्यामुळे गाेडाऊन फुल्ल झाले अाहेत. त्यामुळे त्या साहित्याचाही लिलाव करण्याची प्रक्रिया राबवली जाणार अाहे.
महापालिका प्रशासनाच्या भूमिकेकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष
बातम्या आणखी आहेत...