आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Municipal Councilors Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगरसेवक अपात्रता प्रकरण; निकाल राखीव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पालिकेच्या तिस-या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या सात नगरसेवकांविरुद्ध तिसरे अपत्य किंवा शपथपत्रात चुकीची माहिती भरल्यासंदर्भात तक्रारी दाखल झाल्या होत्या. याप्रकरणी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यावर केवळ एकाच प्रकरणाचा निकाल आयुक्तांनी दिला असून, उर्वरित सहा प्रकरणांची सुनावणी पूर्ण होऊनही निकाल प्रलंबित आहेत. दीड महिन्यापासून निकाल राखीव असल्याने तक्रारदारांची अडचण झाली आहे.
पालिकेच्या सप्टेंबर २०१३मध्ये झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वॉर्ड क्रमांक १६मधून संतोष मोतीराम पाटील विजयी झाले आहेत. मात्र, निवडणुकीसाठी सादर केलेल्या शपथपत्रात त्यांनी संपत्तीबाबत खोटी माहिती दिल्याची तक्रार कैलास बुधा हटकर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. त्याचप्रमाणे सुनील चुडामण पाटील यांनीही शपथपत्रात खोटी माहिती सादर केली असल्याची तक्रार विक्रम ऊर्फ गणेश सोनवणे यांनी केली होती. तसेच ललित कोल्हे यांनी तिस-या अपत्याची माहिती लपवल्याची तक्रार भुसावळ येथील दिलीप पाटील यांनी केली होती. मात्र, या प्रकरणात आतापर्यंत तक्रारदार समोर आलेला नाही. याशिवाय विष्णू भंगाळे यांनीदेखील तिस-या अपत्याची माहिती लपवल्याची तक्रार चंदन महाजन यांनी, तर शरीफ पिंजारी यांच्या जातवैधता प्रमाणपत्रासंदर्भात कुलभूषण पाटील यांनी तक्रार दाखल केली होती. रमेश जैन यांनी शपत्रपत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार मुकुंद ठाकूर यांनी केली होती. याप्रकरणी दिलेल्या निकालाविरुद्ध तक्रारदार उच्च न्यायालयात गेला आहे. इतर सहा प्रकरणांच्या सुनावणीचे काम दीड महिन्यापासून पूर्ण झाले असले तरी, निकाल मात्र राखून ठेवण्यात आलेला आहे. आयुक्तांनी िदलेला निकाल मान्य नसल्यास तक्रारदारांना उच्च न्यायालयात अपिलाचा मार्ग मोकळा असतो.