आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गब्बर थकबाकीदारांविरुद्ध पालिका बडगा उगारणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महापालिकाप्रशासन पदाधिका-यांच्या आश्रयामुळे गब्बर झालेले मालमत्ताधारक आता कर भरणेसुद्धा टाळू लागले आहेत. त्यांच्यावर पालिका कुठलीही कारवाई करीत नसल्याने धडक वसुली मोहीम राबवत नसल्यामुळे पालिकेची करवसुली घटत आहे.
परिणामी, थकबाकीचा डोंगर वाढत आहे. चालू वर्षात आठ महिने उलटूनही केवळ 28 टक्केच वसुली झाल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. आर्थिक वर्ष संपण्यास आता केवळ चार महिने शिल्लक आहे. त्यामुळे पालिका आता बड्या थकबाकीदारांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारणार आहे.
महापालिकेवर हुडको या वित्तीय संस्थेचे ५१३ कोटी रुपये घेणे आहे. याव्यतिरिक्त जिल्हा बँक अन्य देणीही वेगळीच आहेत. एकीकडे कर्जाचा डोंगर वाढत असताना पालिकेचे हक्काचे उत्पन्न असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीबाबत कमालीची उदासीनता पाहायला मिळत अाहे. पालिका काहीही करत नाही म्हणून करदात्यांचा आत्मविश्वास वाढून कर भरण्याची मानसिकता बळावली आहे. त्यामुळे २७ कोटी ८७ लाख ६४ हजारांची मागची, तर चालू वर्षाची ३८ कोटी ३२ लाख ९४ हजार अशी ६६ कोटी २० लाख ५९ हजार ४२६ रुपयांची थकबाकी झाली आहे. ही रक्कम मिळाल्यास शहरातील रस्ते, गटारी, कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शन यासारख्या महत्त्वाच्या बाबींसाठी खर्च करता येऊ शकते. मात्र, दिवसेंदिवस वसुली कमी आणि थकबाकीचा आकडा वाढत चालला आहे. त्याचा परिणाम नागरिकांच्या हक्काच्या सुविधांवर होताना दिसत आहे. आगामी चार महिने धोक्याचे गीलथकबाकीतून केवळ कोटी २६ लाख ३१ हजार २५८ रुपयांची वसुली झाली असून, हा आकडा केवळ १२ टक्के आहे. तसेच चालू मागणी ३८ कोटी ३२ लाख ९४ हजार ५८६ रुपये असून, १६ कोटी ६३ लाख ४८ हजार ५१३ रुपये वसुली झाली आहे. मागील चालू वसुली केवळ २८ टक्के असून, ही पालिका चालवण्याच्या दृष्टीने धोक्याची घंटाच मानली जात आहे. त्यामुळे अागामी चार महिने प्रशासनाला वसुलीसाठी कसोशीने प्रयत्न करावे लागतील.
लवकरचपथक तयार करणार
मनपाच्या आर्थिक नुकसानीला थकबाकीदारही मोठ्या प्रमाणात जबाबदार असून अाम्ही माेठ्या थकबाकीदारांची यादी तयार केली आहे. आता लवकरच नगररचना, अतिक्रमण प्रभागातील अभियंत्यांचे पथक तयार करून धडक कारवाई केली जाईल. यात जप्ती करणे, बेकायदेशीर बांधकामे पाडणे ही कारवाई केली जाणार आहे. प्रदीपजगताप, उपायुक्त