आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाचखाेर मनपा उपायुक्त रुजू, शासनाच्या नगरविकास विभागाचे आदेश आल्यानंतर निलंबनाची कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक झालेले मनपाचे उपायुक्त राजेंद्र फातले पुन्हा पालिकेच्या सेवेत रुजू झाले आहेत. त्यांना निलंबित करण्याचे अधिकार राज्य शासनाच्या नगरविकास विभागाला अाहेत. त्यामुळे अद्याप कारवाई झाल्यामुळे ते पुन्हा महापालिकेत रुजू झाले आहेत.
उपायुक्त राजेंद्र फातले यांना लाचप्रकरणात लाचलुचपत विभागाने अटक केल्यानंतर ते न्यायालयाच्या आदेशाने दोन दिवस पोलिस कोठडीत हाेते. जामिनावर मुक्त झाल्यानंतर फातले यांनी पुन्हा मनपात रुजू होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर आयुक्त जीवन सोनवणे यांच्याशी संवाद साधून ते पुन्हा रुजू झाले आहेत. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंध विभागाने फातलेंच्या सेवापुस्तकाची माहिती मागवली आहे.

फातलेंना नियमानुसार केले रुजू
^उपायुक्तदर्जाच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे अधिकार नगरविकासच्या सचिवांना आहेत. लाचलुचपत विभागाने मागवलेली माहिती मनपा पुरवत आहे. त्याच विभागाने शासनाला अहवाल पाठवल्यानंतर फातलेंचे निलंबन होईल. तत्पूर्वी ते नियमानुसार कामावर रुजू होऊ शकतात. त्यांच्याकडे कोणतेही महत्त्वाचे काम दिले जाणार नाही. जीवन सोनवणे, आयुक्त.
बातम्या आणखी आहेत...