आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशीपूर्वीच निलंबितांना सामावून घेण्याच्या हालचाली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - टंचाईचा काळ व आर्थिक वर्ष सरत आल्याने वसुली वाढवण्याचे कारण पुढे करत पालिकेत विविध कारणांमुळे निलंबित झालेल्यांना विभागीय चौकशीपूर्वीच सामावून घेण्यात येण्यासाठी प्रय} सुरू आहेत. तसेच काही जणांना कामावर सामावून घेण्यात येऊन शहराबाहेर नियुक्त्याही देण्यात आल्या असून, इतर अधिकार्‍यांनाही सामावून घेण्याच्या प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत.

पालिकेतील अधिकारी व कर्मचार्‍यांना शिस्त लावण्याचा प्रय} तत्कालीन आयुक्त अप्पर जिल्हाधिकारी सोमनाथ गुंजाळ यांनी केला. दरम्यान, आयुक्तपदाची सूत्रे सध्या जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांच्याकडे आहेत; परंतु याबाबत यापूर्वी करण्यात आलेल्या कारवाईमागील पार्श्वभूमी व निलंबनाच्या कारवाईचे गांभीर्य त्यांना पूर्णपणे माहीत नाही. त्यामुळे टंचाईचा काळ व आर्थिक वर्ष संपण्यात असून, वसुलीवर परिणाम होणार असल्याचे कारण पुढे करत निलंबितांना सामावून घेण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकार्‍यांचे मन वळवण्याचे प्रय} सुरू आहेत. चामडे प्रकरणात निलंबित करण्यात आलेले प्रभाग अधिकारी अरविंद भोसले, आरोग्य निरीक्षक, अतिक्रमण विभागप्रमुख एच. एम. खान, आरोग्य विभागातील कर्मचारी संजय ठाकरे व जेसीबीचालक महेश थोरात यांनाही कामावर सामावून घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.

मोहन वाणी सेवेत रुजू - श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानातील कर्मचारी हजेरी फेरफार प्रकरणात ठपका ठेवून कनिष्ठ अभियंता मोहन वाणी यांना तत्कालीन आयुक्त सोमनाथ गुंजाळ यांनी निलंबित केले होते. निलंबनानंतर त्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित होती; मात्र विभागीय चौकशी होण्यापूर्वीच टंचाईचे कारण पुढे करत प्रशासनातर्फे जिल्हाधिकार्‍यांची मंजुरी घेऊन त्यांना कामावर सामावून घेण्यात आले आहे.