आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदार यादीच्या गोंधळावर खंडपीठात याचिका दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - पालिका निवडणुकीसाठी १६ सप्टेंबरला प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला आहे. याबाबत प्रभाग क्रमांक नऊमधील तक्रारदार सूरज मूलचंद चावरिया यांनी हरकत घेऊनही ती नामंजूर करण्यात आल्याने याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
पालिका निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. याबाबत १६ सप्टेंबरला प्रारूप यादी जाहीर करण्यात आली. यादीतील घोळ निदर्शनास आल्याने तक्रारदार सूरज ऊर्फ गब्बर मूलचंद चावरिया यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे ऑक्टोबरला हरकत दिली होती. मात्र, १३ ऑक्टोबरला तहसीलदार निवडणूक निर्णय अधिकारी यांनी हरकत नामंजूर केली. या निर्णयाविरुद्ध सूरज चावरिया यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका क्रमांक १०७६१/२०१६ दाखल केली. २१ ऑक्टोबरला या प्रकरणावर सुनावणी होणार होती. मात्र, त्या दिवशी कामकाज झाल्याने आता मंगळवारी किंवा बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. तक्रारदारातर्फे अॅड. निर्मल दायमा कामकाज पाहत आहेत.
तक्रारी वाढण्याची शक्यता : शहरातपालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी तयार झाली. यानंतरही मतदार याद्यांच्या गोंधळाच्या तक्रारी कमी होत नसल्याचे चित्र आहे. मतदार यादीबाबत आता पहिली जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली असून, शहरातील अाणखी काही याचिका दाखल होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासनाच्या अडचणी वाढणार आहेत.

शहरातील प्रभाग आठमधील तिढा कायम
शहरातील प्रभाग आठमधील काही मतदारांची नावे प्रभाग सातमध्ये असल्याबाबत प्रा. धीरज पाटील यांनी तब्बल ४३६ हरकती दाखल केल्या होत्या. मात्र, या हरकतींवर निर्णय झाला नाही. यामुळे पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे. याबाबत चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश तहसीलदारांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, अद्यापही तिढा सुटलेला नाही. याप्रकरणी प्रभाग सातच्या मतदान केंद्रांवर निषेधपेटी लावण्याचा इशाराही प्रा. पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगासह प्रशासकीय यंत्रणेला दिला आहे.
बातम्या आणखी आहेत...