आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळात पाच विद्यमान नगरसेवकांचे अर्ज दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - पालिका निवडणुकीसाठी माजी आमदार संतोष चौधरी यांचे पुत्र सचिन चौधरी नगराध्यक्ष अख्तर पिंजारी यांनी गुरुवारी शनी मंदिर वाॅर्डातील जय सियाराम कॉम्प्लेक्समध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. सचिन चौधरी यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यातच त्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्याने राजकीय समीकरणांना गती मिळाली आहे. नगराध्यक्ष अख्तर पिंजारी, माजी जि. प.सदस्य डॉ.वसंत झाडखंडे, आरपीआयचे (गवई गट) जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, कैलास महाजन, अशोक चौधरी, संतोष चौधरी (दाढी), नितीन धांडे, रवींद्र सपकाळे यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. जनाधार विकास पार्टीतर्फे निवडणूक लढवू, असे सचिन चौधरी यांनी कळवले आहे.
पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत गुरुवारी नगरसेवकपदासाठी २१, तर नगराध्यक्षपदासाठी एक असे २२ उमेदवारी अर्ज दाखल झाले. अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये पालिकेच्या पाच विद्यमान नगरसेवकांचा समावेश आहे.

पालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. पहिले दोन दिवस तांत्रिक अडचणींमुळे वाया गेल्याने एकही अर्ज दाखल झाला नाही. तसेच तिसऱ्या दिवशी चार उमेदवारांनी सहा अर्ज दाखल केले हाेते. गुरुवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी २२ अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर यांच्याकडे दाखल झाले. २९ अाॅक्टाेबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. गुरुवारपर्यंत राजकीय पक्षांतर्फे कुणीही अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे आगामी काळातील उत्सुकता वाढली आहे. तहसील कार्यालयातील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

एबीफॉर्म जोडता अर्ज : गुरुवारीदाखल नगरसेवकपदाच्या २१ अर्जांमध्ये पाच विद्यमान नगरसेवकांचा समावेश आहे. पाचही नगरसेवकांनी अर्जांसोबत पक्षाचा एबी फॉर्म जोडलेला नाही. भाजपचे शहराध्यक्ष पुरुषाेत्तम नारखेडे यांच्या पत्नी तथा विद्यमान नगरसेविका शैलजा नारखेडे (प्रभाग १९ ‘अ’), शाेभा नेमाडे (प्रभाग २० ‘अ’), अरुणाबाई सुरवाडे (प्रभाग ‘अ’), मेघा वाणी (प्रभाग १० ‘अ’) शेख मुश्ताक मुसा (प्रभाग १७ ‘ब’) या विद्यमान नगरसेवकांनी अर्ज दाखल केले. यांच्यासह नूतन जावळे (प्रभाग ‘अ’), शिशिर जावळे (प्रभाग २२ ‘ब’), सविता पिठले (प्रभाग अ) यांनीही अर्ज दाखल केले.

नगराध्यक्ष पदासाठी एक अर्ज : लाेकनियुक्तनगराध्यक्षपदासाठी गुरुवारी रशिदा इस्माईल शेख (रा.काजी प्लॉट) यांनी पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला.
बातम्या आणखी आहेत...