आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावल तालुका: तिरंगी लढत रंगणार;बंडाळी शक्य!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल - पंचायत समिती आणि जिल्हापरिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तसेच भाजप अणि शिवसेना यांची युती होणार नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे.
यावल तालुक्यात पंचायत समिती सदस्य संख्या दहा तर जिल्हा परिषद सदस्यांची संख्या पाच आहे. यापैकी राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेत दोन, पंचायत समितीत चार अशा केवळ सहा जागा देण्याची भारतीय काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी सांगतात. परस्परांतील वादाने दोघांत कलगीतुरा रंगला आहे. भाजपचा पवित्रा स्वबळावर लढण्याचा नाही. तर शिवसेनेचे यावल तालुकाध्यक्ष उमेश फेगडे पक्षात नसल्याने तालुका शिवसेना काय निर्णय घेते याकडे तालुक्यातील शिवसैनिकांचे लक्ष लागून आहे. तालुक्यातील सर्वच पक्षांचे प्रमुख कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्यास ते बंडाळी करतील, अशी भाषा वापरत असल्याने ऐनवेळी बंडखोरी होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. कोणत्या पक्षाची कोणाशी युती होती याची उत्कंठा लागून आहे. दरम्यान, यावल तालुक्यातील इच्छुकांनी भेटीगाठींवर भर दिला आहे. नेत्यांनीही इच्छुकांची काही जिल्हा परिषद गटात चाचपणी सुरू झाली आहे.
स्थानिक उमेदवाराचा अभाव - जिल्हापरिषद किनगाव डांभुर्णी गटात जिल्हा बँकेचे संचालक आर. जी. पाटील, सौखेडा हिंगोणा गटात काँग्रेसच्या वाटेवर असलेले भरत महाजन तर भालोद पाडळसे गटात काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे हे स्थानिक उमेदवार नसल्याने काँग्रेसच्या निर्णयाकडे सूध्दा लक्ष लागून आहे.
30 अर्जांची विक्री - बुधवारपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असली तरी पहिल्या दिवशी केवळ 30 अर्ज विक्री झाले आहेत. पक्षाकडून अधिकृत एबी फॉर्म मिळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील इच्छूक उमेदवार संभ्रमात आहेत.
भाजप स्वबळावर लढणार - भाजप सेनेची आतापर्यंत जिल्हापरिषदेत कधीही युती करुन लढल्या नाहीत. सेनेच्या पदाधिकार्यांनी युती संदर्भात कोणताही संपर्क साधला नाही. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीत भाजप सेना युती होणार आहे. - हरिभाऊ जावळे, खासदार रावेर लोकसभा मतदार संघ
आघाडीसाठी अनुकूल - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी होणे गरजेचे आहे. शेवटी राष्ट्रवादी मित्रपक्ष आहे. राष्ट्रवादीला जिल्हापरिषदसाठी एक तर पंचायत समितीत दोन किंवा तीन जागा देऊ आणि सक्षम अशा उमेदवारास आमचा पूर्ण पाठींबा राहिल. - प्रभाकर सोनवणे, तालुकाध्यक्ष काँग्रेस पक्ष
* काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीला विश्वासात घेत नसून आम्ही देऊ तेवढयाच जागांवर निवडणूक लढवा, असे काँग्रेस राष्ट्रवादीला ठासून सांगत आहे. राष्ट्रवादीचे आमदार आणि पालकमंत्री गुलाबराव देवकर असताना जागा कमी का ? हा प्रश्नच आहे. - विजय पाटील, जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस