आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जूनअखेर होणार प्रभाग रचना; माेर्चेबांधणी सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - डिसेंबरमध्ये होणाऱ्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आता प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांप्रमाणे जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत प्रभाग रचना आरक्षण सोडतीचे नियोजन जाहीर केले जाणार आहे. तर जुलैमध्ये विभागीय आयुक्तांकडे हरकती नोंदवता येतील. तत्पूर्वी प्रस्थापितांच्या मार्गदर्शनात इच्छुकांनी माेर्चेबांधणी सुरू केली अाहे.
राज्य निवडणूक आयोगाने मे रोजी पालिकांच्या प्रभाग रचनेला मान्यता देण्याबाबत आदेश निर्गमित केला होता. यामुळे पालिका प्रशासन आता कामाला लागले आहे. सध्या मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर रजेवर असल्याने प्रभाग रचना आरक्षण सोडतीचे काम थांबले असले तरी ते १५ जूननंतर पालिकेतील पदभार सांभाळणार आहेत. यानंतर तत्काळ शहरातील प्रभागांची रचना करून त्याची तपासणी करण्यात येईल.

राज्य निवडणूक आयोगाच्या पुढील सूचनेनंतर प्रभाग रचना जाहीर करतानाच आरक्षण सोडतही काढली जाणार आहे. यास अंतिम मंजुरी घेऊन प्रसिद्धी केली जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण केली जाणार आहे. साधारण १५ जूननंतर या कामाला सुरुवात केली जाणार आहे. तर जुलै महिन्यात राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त होणाऱ्या हरकतींवर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी होईल. यानंतर सुनावणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त अहवालानुसार अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देण्यासोबत अन्य प्रशासकीय कामकाज केले जाईल. सध्या प्रशासनाने ही सर्व कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती मुख्याधिकारी बी. टी. बाविस्कर यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिली.
बातम्या आणखी आहेत...