आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - समतानगरातील घराच्या कराची विभागणी करून देण्यासाठी दीड हजाराची लाच घेताना मनपाच्या दोन लिपिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. बुधवारी दुपारी मेहरूण परिसरातील मनपाच्या प्रभाग क्रमांक मधील कार्यालयात हा प्रकार घडला.
समतानगरात तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावावर घर अाहे. त्यातील निम्मे घर त्यांना नावावर करायचे अाहे. त्यामुळे घरपट्टी अाणि पाणपट्टी तक्रारदार त्याच्या वडिलांच्या नावाने प्रत्येकी ५० टक्के करणे गरजेचे हाेते.
२१ सप्टेंबरला संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करून तक्रारदाराने मेहरूणमधील मनपाच्या प्रभाग क्रमांक मधील कार्यालयात जाऊन लिपिक अशाेक बंडू म्हस्के अशाेक बळीराम सैंदाणे यांची भेट घेतली. त्यांनी कराची विभागणी करून देण्यासाठी हजार रुपये लाचेची मागणी केेली. या प्रकरणी तक्रारदाराने २२ सप्टेंबर राेजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक पराग साेनवणे यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर तक्रारदाराने तडजाेडीनंतर हजार ५०० रुपये देण्याचे कबुल केले. बुधवारी दुपारी ३.३० वाजता एसीबीच्या पथकाने सापळा रचून मेहरूण महापालिका कार्यालयात म्हस्के अाणि सैंदाणे यांना रंगेहाथ अटक केली. त्यांच्यावर एमअायडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.
बातम्या आणखी आहेत...