जळगाव - जिल्हाधिकारी किशाेर राजेनिंबाळकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे शुक्रवारी रात्री १२ वाजता फुले मार्केटमधील अतिक्रमणाविराेधात महापालिकेने कारवाईला सुरुवात केली. या वेळी नागरिकांसह विक्रेत्यांची माेठी गर्दी झाली हाेती.
पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधीक्षक एच.एम.खान यांच्या नेतृत्वात विजय देशमुख अतिश राणा यांच्यासह २० जणांच्या पथकाने रात्री १२ वाजता फुले मार्केटसमाेरील जुन्या नगरपालिकेच्या जागेतील लाेखंडी पेट्या, चायनीजच्या गाड्या जप्त करून मध्यरात्रीच्या धडक माेहिमेचा शुभारंभ केला. पालिकेचे पथक अचानक मध्यरात्री करित असलेल्या कारवाईची चाहूल लागताच विक्रेत्यांनी धावपळ सुरू झाली हाेती. काही विक्रेत्यांनी नुकसान टाळण्यासाठी रात्री झाेपेतून उठून येत साहित्य घरी नेले.
जळगाव शनिवाररविवार या सुटीच्या दिवशीही महापालिका कार्यालय खुले ठेवून पुढील चार दिवस दररोज सकाळी वाजेपासून सर्व विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शहरातील वॉर्डनिहाय सर्व व्यापारी संकुलांमध्ये दिवसभर स्वच्छता मोहीम राबवण्यासह पोलिस संरक्षणात अतिक्रमणाची कारवाई ही मध्यरात्री १२ ते सायंकाळी या वेळेत करण्याचे आदेश प्रभारी आयुक्त किशोर राजेनिंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.
पालिका स्थायी समिती सभेत शुक्रवारी सदस्यांनी अस्वच्छता, शौचालयांची दुरवस्था, खड्डे यासह आरोग्यविषयक तक्रारी केल्यानंतर राजेनिंबाळकर यांनी आदेश दिले. दरम्यान, शनिवारी सकाळी वाजता प्रभाग समिती मध्ये साफसफाईची संयुक्त मोहीम राबण्यात येणार आहे. यात आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा आणि अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि कमर्चारी सहभागी होणार आहेत. कर भरणाऱ्या जनतेला सुविधा देणे आवश्यक आहे. साधनसुविधेचे कारण पुढे करून कामे टाळण्याचा अधिक प्रयत्न अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. यामुळे योग्य नियोजनात महापालिका कमी पडत आहे. परिणामी जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याची स्थिती आहे. यामुळे महापालिकेची बदनामी होत आहे. योग्य वेळेत जनतेच्या मागणीनुसार कामे केल्यास जनतेची साथ मिळते. मात्र, यासाठी कामे करण्याची मानसिकता कायम ठेवण्याचा सल्लाही प्रभारी आयुक्त राजेनिंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना देत, कामे झाल्यास परिणामांना सामोरे जा, अशी तंबीही दिली. तर मनपात पडून असलेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ट्रॅक्टर, टँकर, फॉगिंग मशीन, व्हॅक्युमपंपसह सेफ्टी टँकर, फवारणी यंत्र खरेदीचे आदेश प्रभारी आयुक्तांनी दिले. यासाठी तत्काळ टेंडर काढून योग्य कंपनीचे निवड करून अंदाजपत्रक तत्काळ सादर करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या.
थकबाकीदारांच्या घरापुढे वाजवणार बॅण्ड : जनतेलासेवा देण्यास आपण बांधिल आहोत. मात्र, त्या बरोबरच नागरिकांनीही कराचा भरणा केला पाहिजे. या वसुलीसाठी थकबाकीदारांना आवाहन करा, शनिवार, रविवार वसुली सुरू ठेवण्यासह ज्यांच्याकडे मोठ्याप्रमाणात थकबाकी असेल, त्यांच्या घरापुढे बॅण्ड वाजवून वसुली करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. शंभर टक्के वसुली असेल तर शंभर टक्के सुविधा देण्यासाठी तयार रहा, अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या.
अन्यथा व्यापारी संकुल करणार बंद : हॉकर्सअथवा गाळेधारकांना त्रास देण्याचा आपला कोणताही उद्देश नाही. मात्र, त्यांनी किमान आपल्या परिसराची स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. वारंवार सूचना देऊनही तसे केल्यास गोलाणीप्रमाणेच शहरातील सर्व व्यापारी संकुले कायद्यांतर्गत बंद केले जातील. अतिक्रमणही स्वत:हून काढावे. कारवाई आधी जाहीर ध्वनिक्षेपकावरून सूचना देण्याचे आदेशही देण्यात आले.
सकाळीवाजेपासून नियोजन २२ राेजी सकाळीवाजेपासून प्रभाग क्रमांक ७, ८, १० मधील घाणेकर चाैक, शामाप्रसाद मुखर्जी उद्यान, शाहु महाराज रूग्णालय, ख्वाॅजामिया दर्गा या ठिकाणांपासून मोहीमाला सुरूवात हाेईल. २३जुलैला प्रभागक्रमांक २,३,४,६ मध्ये मोहीम राबवले जाणार असून गेंदालाल मील गेट समाेर, शिवाजी नगर चाैक, हनुमान मंदिर जवळ ममुराबाद राेड, वाल्मीक नगर पुतळ्याजवळून सुरूवात हाेईल. २४जुलैला प्रभागक्रमांक १९,२०,३४,३५ या प्रभागात अायएमअार काॅलेजजवळ, बालगंधर्व नाट्यगृह, हॉटेल त्रिमुर्तीजवळ, अशाेक किराणा जवळ येथून सुरूवात हाेईल. २५जुलै राेजीप्रभाग क्रमांक ३०,३१,३२,,३३,३६ या भागात शिरसाेली नाका युनिट क्रमांक १०, नगरसेवक नितीन बरडे यांच्या घराजवळून सुरूवात हाेईल.