आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Four Members Will Be Going On DPC, Divya Marathi

मनपाचे चार सदस्य डीपीसीवर जाणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - वेळेत निवडणूक कार्यक्रम जाहीर न झाल्यामुळे महापालिकेचे सदस्य जिल्हा नियोजन समितीवर प्रतिनिधित्व करू शकले नाही. त्यामुळे सलग दोन बैठकांमध्ये पालिकेशी विषयही मांडण्यात आले नाहीत. दरम्यान, यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीतर्फे राज्य शासनाला निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची विनंती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.
जिल्हा नियोजन समितीवर एकूण 40 सदस्य निवडणुकीद्वारे निवडले जातात. त्यात महापालिका क्षेत्रातून 4, लहान नागरी गट म्हणजे नगरपालिका क्षेत्रातून 8 आणि ग्रामीण क्षेत्रातून जिल्हा परिषद सदस्यांमधून 28 जण निवडले जातात. सप्टेंबर 2013मध्ये महानगरपालिकेची निवडणूक झाल्याने या समितीत नवीन सदस्यांनी निवड होणे अपेक्षित होते. मात्र, नऊ महिने उलटूनदेखील महापालिकेला या समितीत प्रतिनिधित्व मिळालेले नाही. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने महापालिका सदस्यांच्या अनुपस्थितीबाबत वृत्त प्रसिद्ध करताच नियोजन अधिकार्‍यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासंदर्भात राज्य शासनाला पत्र पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या. याबाबत शासनाच्या नियोजन विभागाकडे शुक्रवारी पत्र पाठवले जाणार आहे.