आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal On Infringement Temporary Bandage Tower

टॉवर चौकात अतिक्रमणावर मनपाची तात्पुरती मलमपट्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अतिक्रमणकायम रहेगा! हे जणू महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे ब्रिद वाक्य झाले अाहे. शहरातील रस्त्यावर पायी चालण्यासाठी वाहनांसाठी जागा कमी अाणि अतिक्रमण अधिक असल्याचे चित्र अाहे. पालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाईचा देखावा मधून मधून करत असते. असाच देखावा बुधवारी महापालिकेने केला. काही तासांनंतर रस्त्यावर पुन्हा ‘जैसे थे’ अतिक्रमण झाल्याने वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे कारवाईचा बोजवारा उडाला.
शहरातील अत्यंत गजबजलेल्या टॉवर चौक ते गांधी मार्केटपर्यंतच्या रस्त्यावरील रिक्षांसह फेरीवाल्यांना हटवण्याची मोहीम महापालिकेतर्फे बुधवारी सकाळी राबवण्यात आली.
यामुळे हा रस्ता पूर्णपणे मोकळा झाल्याने नागरिकांसह वाहनचालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र अवघ्या काही तासांतच या रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त हाेत हाेता. टॉवर रस्त्यावर गांधी मार्केटसह महात्मा फुले मार्केट आहे. त्यामुळे या परिसरात विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची रोज मोठी गर्दी होत असते. खरेदीसाठी आलेले नागरिक रस्त्याच्या दुतर्फा दुचाकींची पार्किंग करतात. फेरीवाले, विविध फळ विक्रेतेही जागा अडवून बसतात. तर दुभाजकाच्या मध्येच रिक्षा उभ्या राहत असल्याने या रस्त्यावर मोठी कोंडी होत असते.

घाणेकर चौकात अधिकच वाहतुकीची कोंडी होते. ही कोंडी सोडवण्यासाठी महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग अधू्न-मधून कारवाई करते. कारवाई करण्यात ते रस्त्याच्या मधाेमध गाडीदेखील लावतात. थाेडा वेळ विक्रेत्यांचे साहित्य जमा करतात पण ते गेल्यानंतर रस्त्यावर पुन्हा तिच परिस्थिती दिसते.

पर्यायी व्यवस्था व्हावी
रस्त्यावरपार्किंगची समस्या साेडवण्यासाठी जुन्या नगरपालिकेच्या जागेवर भराव करण्याचा विषय अनेक दिवसांपासून रखडलेला अाहे. ताे जरी मार्गी लागला तर नागरिकांची माेठी
गैरसाेय दूर होईल.
अतिक्रमण निर्मूलन विभागाची नेहमीची कारवाई होती. सुमारे २० ते ३० फेरीवाल्यांना हटवण्यात आले. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला. दिवसभर अतिक्रमण विभागाचे वाहन या परिसरात उभे होते. इस्माईलशेख, अतिक्रमण अधिकारी, मनपा
रस्त्यावर पार्किंग
मार्केटमध्येयेणारे नागरिक शहर पाेलिस ठाण्याच्या बाहेर किंवा रस्त्यांच्या मधाेमध वाहने उभी करत असल्याने वाहतूक काेंडी हाेत असते. हा प्रकार टाॅवर चाैकात उभे असलेले वाहतूक पाेलिस पाहत असतात. पण कुणीही वाहनधारकांना हटकण्याची तसदी घेत नसल्याने वाहतुकीचा प्रश्न एेरणीवर अाला अाहे.

पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी बुधवारी टॉवर ते सुभाष चौकपर्यंत पाहणी केली. या वेळी नियम मोडणाऱ्यांना समज दिली.
अतिक्रमण काढल्यानंतर काही तास टॉवर चौकातील रस्ता असा मोकळा होता.