आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिस महापालिकेत; चाैकशीला सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शहर पाेलिस ठाण्यातून बाहेर पडताना उपायुक्त अविनाश गांगाेडे अाणि प्रदीप जगताप.)
जळगाव- महापािलकाअायुक्तांवरील संभाव्य हल्ल्याप्रकरणी अाता पाेलिस चाैकशीला सुरुवात झाली अाहे. गुरुवारी सकाळी शहर पाेलिस ठाण्याच्या पाेलिस निरीक्षकांनी महापालिकेत अायुक्तांशी १५ मिनिटे चर्चा केली. त्यानंतर त्यांनी दुपारी दाेघा उपायुक्ताना चर्चेसाठी शहर पाेलिस ठाण्यात बाेलावले हाेते. सुमारे पाऊण तास ही चर्चा सुरू हाेती. यात िवविध विषयांबाबत माहिती घेण्यात अाली. लवकरच अायुक्त उपायुक्तांचेही जबाब पाेलिस नाेंदवणार अाहेत. यात ते काय भूमिका मांडतात, त्यानंतरच तपासाला गती प्राप्त हाेणार अाहे.
महापालिकेशी निगडीत विविध संवेदनशील प्रकरणांचा तपास सुरू असताना गेल्या काही महिन्यांत प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांशी नगरसेवकांचा हाेणाऱ्या संवादाकडे लक्ष वेधले जात अाहे. भ्रष्टाचाराच्या अाराेपांसह अधिकाऱ्यांचा हाेणारा एकेरी उल्लेख, यात प्रशासनाच्या कारभारामुळे काहीही हाेण्याची व्यक्त केलेली भीती, यामुळेच अायुक्त हादरल्याचे बाेलले जात अाहे. या प्रकरणाचा पाेलिस तपास गुरुवारी खऱ्या अर्थाने सुरू झाला. सकाळी शहर पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक नवलनाथ तांबे यांच्यासह दाेन पाेलिस उपनिरीक्षक महापािलकेत अाले हाेते. त्यांनी अायुक्त संजय कापडणीस यांची भेट घेऊन सुमारे १५ मिनिटे चर्चा केली. त्यानंतर त्यांनी दुपारी २.१५ वाजता उपायुक्त अविनाश गांगाेडे अाणि प्रदीप जगताप यांना शहर पाेिलस ठाण्यात बाेलावले हाेते. त्यांच्याशी त्यांनी गाेपनीय विभागात सुमारे पाऊण तास चर्चा केली. दुपारी वाजता दाेन्ही उपायुक्त पाेलिस ठाण्याच्या बाहेर पडले.

महासभा वादळी ठरण्याची शक्यता
महापालिकेचीिवशेष महासभा शुक्रवारी महापाैर राखी साेनवणे यांच्या अध्यक्षतेखाली अायाेजित करण्यात अाली अाहे. या सभेत चर्चेसाठी उड्डाणपूल बजरंग बाेगद्याच्या बांधकामाशी निगडीत िवषयांचा समावेश केला अाहे. या वेळी नगरसेवक अायुक्तांना संशयितांची नावे िवचारण्याची शक्यता अाहे. त्यामुळे एखादेवेळी उड्डाणपुल बाेगद्याचा िवषय मागे पडू शकताे. परंतु अायुक्त सुटीवर असल्याने सभेला उपस्थित राहतात की नाही, यािवषयी शंका अाहे. दरम्यान, गुरुवारी देखील अायुक्त अर्ध्या िदवसाच्या सुटीवर गेले हाेते.

अायुक्तांचा कांगावा; स्थायी सभापतींचा अाराेप
आतापर्यंतराजकारण्यांना धमकी येते हे एेकून होते; परंतु आता अधिकाऱ्यांवरही हल्ला होऊ शकतो, याचे आश्चर्य आहे. जर कोणी अशी धमकी दिली असेल तर त्याचा निषेधच आहे. परंतु असे कोणते काम आयुक्तांनी केले की त्यामुळे त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो? हा देखील एक प्रश्न आहे. एकही काम पूर्ण केल्यामुळे हा कांगावा वाटतो. याप्रकरणाची चौकशी व्हायला हवी. काही नगरसेवकांचा पत्रात उल्लेख केला अाहे. मनपात ५२ टक्के महिला नगरसेविका अाहेत. त्यांनी एकतर नावाचा उल्लेख करून स्पष्ट करावे. नाव घेतल्यामुळे सगळ्याच नगरसेवकांकडे चुकीच्या नजरेने पाहिले जात अाहे. पाेलिस प्रशासनानेही सत्यता बाहेर येण्यासाठी सखाेल चाैकशी करणे गरजेचे असल्याचे मत स्थायी समिती सभापती ज्योती चव्हाण यांनी व्यक्त केले