आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाच्या मालमत्तांचा दाेन दिवसांत अहवाल मागवला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेवर सातत्याने कर्जबाजारीपणाचा ठपका ठेवला जात अाहे. तसेच कंगाल महापालिका म्हणून हिणवले जात अाहे. परंतु, महापालिकेच्या मालकीच्या किती मालमत्ता अाहेत? त्यांचे अाजचे बाजारमूल्य किती? हे एकदा सगळ्यांसमाेर उघड हाेऊ द्या, अशी मागणी खाविअातर्फे करण्यात अाली. परंतु, पालिकेच्या स्थापनेला १४ वर्षे उलटूनही प्रशासनाकडे स्वत:च्या मालकीच्या मालमत्तांची माहितीदेखील नसल्याची बाब स्थायी समितीच्या सभेत उघड झाली.
त्यामुळे दाेन दिवसांत तातडीने अहवाल देण्याचे अादेश सभेत देण्यात अाले अाहेत.
हुडकाे जिल्हा बँकेचे कर्ज त्यात उत्पन्नाचे स्त्राेत कमी झाल्याने हलाखीची परिस्थिती निर्माण झालेल्या महापालिकेकडे प्रत्येक जण चुकीच्या नजरेने पाहतोय. पालिकेची स्थिती अाजही इतकी वाईट नसल्याचे मत लाेकप्रतिनिधींचे अाहे. परंतु, पालिकेच्या मालमत्तांचे मूल्य नेमके किती? याची माहितीच सर्वसामान्य जनतेला नाही.
यासंदर्भात मागच्या स्थायी समिती सभेत सभापती नितीन बरडे यांनी संपूर्ण माहिती देण्याचे अादेश दिले हाेते. शुक्रवारच्या सभेत याचसंदर्भात िनतीन लढ्ढा यांनी विचारणा केली. परंतु, अधिकारी मात्र एकमेकांच्या ताेंडाकडे पाहत गुपचूप बसले हाेते. पालिकेच्या िकती मालमत्ता अाहेत? त्यांचे बाजारमूल्य किती? याचे साधे उत्तरही काेणी देऊ शकले नाही. त्यामुळे अापणच अापल्या मालमत्तांबाबत किती गंभीर अाहाेत? याचा पर्दाफाश सभेत करण्यात अाला. सभेत निलंबित अाराेग्याधिकारी डाॅ.विकास पाटील यांचे वेतनवाढ राेखण्याची कारवाई रद्द करण्यात अाली. कर्मचाऱ्याला अाेळखत नाही, म्हणून कारवाई करणे याेग्य नसल्याचे या वेळी सांगण्यात अाले. तसेच अॅलम खरेदी करता स्पर्धा व्हावी, यासाठी उत्पादक पुरवठादार यांनाही संधी मिळावी, म्हणून अटी शर्तीत बदल करण्याचा निर्णय घेण्यात अाला.

जागेवरूननाराजी
सन१८८३ मध्ये ट्रान्सपाेर्टसाठी जागा दिली हाेती. त्याचा करार सन १९८६ मध्ये संपला अाहे. परंतु, गेल्या चार वर्षांपासून पाठपुरावा करूनही प्रशासन काहीही कारवाई करत नसल्याने लढ्ढा यांनी नाराजी व्यक्त केली. ३० वर्षे उलटले तरी चार एकर जागेबाबत प्रशासन उदासीन भूमिका का बजावतेय? असा सवाल केला. भूसंपादनासाठी नगररचना विभागात अाठ काेटी जमा असताना जागा खरेदी केली जात नसल्याने संशय व्यक्त केला. पालिकेतील महत्त्वाच्या पदांची थेट सरळ सेवेने भरती करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याची मागणीही करण्यात अाली.

समन्वयाचा अभाव
सभांमध्येनगरसेवकांच्या प्रश्नांना ठाेस उत्तरे दिले जात नाहीत. शहरातील परिस्थिती प्रचंड भयावह अाहे. प्रत्येक कामात दिरंगाई हाेत अाहे. अधिकारी एकमेकांच्या भूमिकेवर अविश्वास व्यक्त करतात. टिप्पणीमध्ये अाक्षेप नाेंदवतात. अधिकाऱ्यांमध्येच समन्वय नसल्याने काम एकमेकांवर ढकलण्याची वृत्ती वाढत असल्याचा अाराेप करण्यात अाला.

१५ दिवसांत आकडा निश्चित
२०१३च्या मालमत्तेच्या मूल्यांकनानुसार पालिकेची मालमत्ता सुमारे २२०० ते २३०० कोटींची असल्याचे सांगितले जात आहे. बांधकाम विभागाकडून मालमत्तांची यादी नगररचना विभागाकडे पाठवण्यात आली आहे. आता सध्याच्या रेडी रेकनरनुसार मालमत्तांचे फेर मूल्यांकन करण्यात येणार आहे. हा आकडा येत्या १५ दिवसांत जाहीर केला जाणार आहे.

जलतरण तलाव सुरू करा
मक्तेदारासाेबतच्यावादामुळे महिनाभरापासून पालिकेचा जलतरण तलाव बंद अाहे. दरराेज पाेहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची अडचण हाेत असून काही नागरिकांनी ताे दुरुस्त करण्यासाठी हातभार लावण्याची तयारीही दर्शवली अाहे. त्यामुळे मक्तेदाराच्या ताब्यातून तातडीने पंचनामा करून ताब्यात घ्यावा. तसेच तात्पुरत्या स्वरुपात पालिकेनेच चालवावा, अशी सूचना करण्यात अाली. जाणता राजा व्यायाम विद्यालय दाेन महिन्यांनंतर सुरू हाेणार असल्याचे सांगण्यात अाले. पृथ्वीराज साेनवणेंनी दाेन महिन्यांपासून व्यायाम शाळा बंद असल्याची तक्रार केली.