आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अतिक्रमण कारवाईत पालिका, सत्ताधाऱ्यांची सोयीची भूमिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातील अतिक्रमण काढण्याचा विषय गेल्या चार महिन्यांपासून चांगलाच तापला आहे. प्रमुख ११ रस्ते मोकळे करण्याचा पालिका प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या निर्णयात आता तफावत दिसून येत असल्याचे सोमवारी मनपातर्फे फुले मार्केटमध्ये करण्यात आलेल्या कारवाईतून स्पष्ट दिसले. शिवतीर्थ मैदानालगत नुकत्याच थाटण्यात आलेल्या स्वेटर विक्रीची दुकाने हलवण्याचा आयुक्तांचा आदेश आहे. परंतु, सत्ताधाऱ्यांमुळे ही कारवाई थांबल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे एकीकडे सुभाष चौक, शिवाजी रोड येथील हॉकर्सबाबतीत कठोर भूमिका तर दुसरीकडे स्वेटर विक्रेत्यांना अभय दिले जात आहे.

तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी शहरातील ११ रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पर्यायी जागा शोधणे, भाजीपाला विक्रेत्यांना पर्यायी जागांचे वितरण अशी प्रक्रिया पार पडली. याला बळीरामपेठ भागातील भाजीपाला विक्रेत्यांनी कडवा विरोध केला. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, तर सुभाष चौक, शिवाजी रोडवरील हॉकर्सला हटवण्यात आले आहे. स्वेटर विक्रेत्यांनी थाटलेली दुकानेदेखील बेकायदेशीर आहेत. त्यामुळे आयुक्तांनी गेल्या शनिवारी त्यांना हलवण्याचे आदेश दिले होते. मात्र, स्वेटर विक्रेत्यांनी २३ नोव्हेंबर रोजी अर्धा दिवस दुकाने बंद ठेवली त्याच दिवशी ते महापौर नितीन लढ्ढा यांना भेटून आले, त्यानंतर त्यांनी पुन्हा दुकाने सुरू केली. आयुक्त दुकाने हलवण्याचा आदेश देतात, तर महापौर त्यांना अभय देत आहेत. त्यामुळे प्रशासन सत्ताधारी यांच्या कार्यपद्धतीत विरोधाभास दिसून येत आहे. तर, स्वेटर विक्रेत्यांनाच अभय का? असा प्रश्न इतर हॉकर्सच्या मनात उद्भवतो आहे.

पुण्यतिथीसाठी काढले अतिक्रमण
सोमवारीमहात्मा जोतिबा फुले यांची पुण्यतिथी होती. त्यासाठी फुले मार्केट येथील त्यांच्या पुतळ्याला लागून असलेले अतिक्रमण काढण्यात आले. फुले मार्केटमधील ही जागा मोकळी करण्यासाठी पालिका बऱ्याच वर्षांपासून प्रयत्न करीत आहे, तेथे कायम लपंडाव सुरू असतो. सोमवारी सकाळी वाजताच अतिक्रमणच्या पथकाने कारवाई सुरू केली. हॉकर्सची मुख्य गल्ली संपूर्णपणे मोकळी केली. मार्केटनेही मोकळा श्वास घेतला. अन्यथा येथील अतिक्रमण काढण्यात पालिका प्रत्येक वेळी अपयशी ठरली आहे. कारवाईत दोन विक्रेत्यांचा सामान जप्त करण्यात आला आहे. हा कारवाईचा फार्स संपताच दुपारच्या वेळेस पुन्हा जैसे थे परिस्थिती झाली होती. त्यामुळे काही तासांसाठीच ही कारवाई झाल्याचे उघडकीस आले. तसेच सोमवारी गणेश कॉलनी चौकातदेखील कारवाई करण्यात आली. येथे भाजीपाला चहाची टपरी जप्त करण्यात आली आहे.

आता हटवणे योग्य होणार नाही
स्वेटरविक्रेत्यांनाआता एक महिना झाला आहे, आता महिनाभर त्यांचा व्यवसाय चालणार आहे. त्यानंतर ही जागा मोकळी होईल. आता त्यांचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू केली तर, त्यात वेळ जाईल. अशात थंडीचा सिजनही संपून जाईल. त्यामुळे त्यांना हटवणे योग्य राहणार नाही.
- नितीन लढ्ढा, महापौर

त्यांना हलवण्यात येणार
एकदारिकामीझालेली जागा दुसऱ्यांना देणे तत्त्वत: मान्य नाही. त्यामुळे स्वेटर्स दुकानदारांना हलवण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी पर्यायी जागा शोधण्याच्या सूचना अतिक्रमण निर्मूलन विभागाला देण्यात आलेल्या आहेत. जागा उपलब्ध होताच त्यांना हलवण्यात येणार आहे.
-जीवन सोनवणे, आयुक्त
बातम्या आणखी आहेत...