आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१३ वर्षांपूर्वी बांधलेल्या ६४ पैकी फक्त गाळ्यांची विक्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शहरातील गोपाळनगर-शारदानगर भागात पालिकेने २००३मध्ये ६४ गाळ्यांच्या व्यापारी संकुलाची उभारणी केली होती. मात्र, तब्बल १३ वर्षांचा काळ लोटल्यावरही या संकुलातील केवळ गाळ्यांची विक्री झाली आहे. पालिकेने लिलाव प्रक्रियाच पूर्ण केल्याने तब्बल एका तपापासून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता धूळ खात पडून आहे.
शहराच्या उत्तर भागात बाजारपेठ विकसित करण्यासाठी उच्चभ्रू वस्ती असलेल्या गोपाळनगरातील खुल्या भूखंडावर पालिकेने सन २००३मध्ये ६४ गाळ्यांचे व्यापारी संकुल उभारले. प्रथमत: नगररचना विभागाकडून मंजुरी घेतलेल्या आराखड्यानुसार तळमजल्यावर व्यापारी गाळे, तर पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर निवासी सदनिकांचे बांधकाम नियोजित होते. मात्र, पालिकेने केवळ गाळ्यांचे बांधकाम करून पुढील मंजुरीची बोळवण केली. यानंतरच्या काळात ६४पैकी केवळ गाळ्यांची विक्री झाली. उर्वरित ५५ गाळे अद्यापही वापराविनाच पडून आहेत. सन २००३मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या कार्यकाळात या संकुलातील गाळ्यांचा लिलाव करण्यासाठी पालिकेने नगररचना विभागाकडून रेडी रेकनरचे दर मागवले होते. यानंतर जाहीर लिलाव करण्यासाठी प्रांताधिकारी, पालिका मुख्याधिकारी सहायकनगर रचना अधिकारी (जळगाव) यांचा समावेश असलेल्या त्रि-सदस्यीय समितीची नियुक्ती झाली होती. या समितीने अतिशय कासवगतीने प्रक्रिया राबवल्याने अद्यापही गाळ्यांचा लिलाव झालेला नाही.

तत्कालीन मुख्याधिकारी अनिल जगताप यांच्या कार्यकाळात या कामाला गती आली होती. यानंतरच्या मुख्याधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केल्याने पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या संकुलाचा सध्या शौचालय म्हणून वापर होतो

प्रक्रिया रखडली : लिलावप्रक्रियेला मुख्याधिकारी जगताप यांच्या काळात वेग आला होता. मात्र, यानंतरच्या काळात अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे प्रक्रिया रखडली. राजकीय दबावाला बळी पडून ही प्रक्रिया थांबली, अशी माहिती माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी दिली.
आता पुन्हा तिच प्रक्रिया :नगररचना विभागाने २००३ मध्ये रेडी रेकनरप्रमाणे गाळ्यांचे दर निश्चित केले होते. मात्र, त्या वेळी प्रक्रिया पूर्ण झाली नाही. आता रेडी रेकनरचे दर वाढले आहेत. यामुळे गाळ्यांच्या लिलावास तीन किंवा पाच सदस्यीय समिती नियुक्त करावी लागेल.

दुटप्पी भूमिका
मुख्याधिकारी बी. टी. बाविस्कर यांच्या कार्यकाळात अतिक्रमण काढण्यात आले. मात्र, यानंतर हॉकर्स झोनची अंमलबजावणी झाली नाही. परिणामी बेरोजगारी वाढली. गोपाळनगर संकुलातील गाळ्यांचे लिलाव झाल्यास शेकडो जणांना रोजगार मिळेल. मात्र, एकीकडे अतिक्रमण काढून बेरोजगारी वाढवणे, तर दुसरीकडे पालिकेची मालमत्ता गोठवून बेरोजगारी वाढवणे, अशी दुटप्पी भूमिका सोडावी लागेल.

दारुड्यांचा अड्डा
या पालिका संकुलाच्या दर्शनी भागातील दुकानांची विक्री झाली आहे. उर्वरित दुकाने वापराविना आहेत. या दुकानांचे शटर गंजले असून गच्चीवर दारुड्यांचा दररोज रात्री मुक्त संचार असतो. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होते. मध्यंतरी संकुलातील एक दुकान जाळण्यात आले होते.
वापराअभावी संकुलाच्या आतमध्ये गवत, झुडुपे वाढली आहेत.

^पालिकेला सर्वाधिक महसूल उत्तर भागातून मिळतो. गोपाळनगरातील संकुलाचा लिलाव होऊन ते वापरात आल्यास परिसरातील बेरोजगारांना रोजगार मिळेल. रहिवाशांचे बाजारपेठेत जाण्याचे कष्ट वाचतील. याकडे पालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे. -विजय जावळे,प्रभात कॉलनी, भुसावळ

बातम्या आणखी आहेत...